‘अन्याय होत असेल तर कोर्टात जा, कोणताच गुन्हा..’, गुलाबराव पाटलांचं एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर

खोटा गुन्हा दाखल करून आपल्याला अटक करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा धक्कादायक आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, की ‘कोणताही गुन्हा हा खोटा दाखल होत नसतो. अन्याय होत असेल तर एकनाथ खडसे यांनी कोर्टात जावं’, असा सल्लाही यावेळी गुलाबराव पाटील यांनी खडसेंना दिला आहे.

एकनाथ खडसे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले, की ‘कोणताही गुन्हा खोटा दाखल होत नसतो, पोलीस चौकशी करूनच गुन्हा दाखल करतात. जे होत आहे ते पाहावं. अन्याय होत असेल तर आपल्यासाठी कोर्ट आहे, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना उत्तर दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.