ऑल इंडिया कराटे स्पर्धा नुकत्याच औरंगाबाद येथे पार पडल्या. मराठा मंदिर सिडको औरंगाबाद या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे आयोजन नेहरू युवा केन्द्र, औरंगाबाद यांनी केले होते.
स्पर्धात 14 / 17 / 19 / या वयोगटातील मुला मुलींचा सहभाग होता. नागपुर, अहमदनगर, नाशिक, गुजरात, बीड, सोलापुर, औरंगाबाद, आन्ध्रप्रदेश, कर्नाटका, जळगाव एवढे जिल्हे व राज्यांमधून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. औरंगाबादचे आमदार अंबादास दानवे यांनी स्पर्धेची भूमिका स्पष्ट केली.
या स्पर्धेचा निकाल असा..
अवनी सोनवणे 12 वर्ष आतील 21 ते 25 किलो वजन गटात सुवर्ण पदक
मृण्मय पाटिल 12 वर्ष आतील 25 ते 30 किलो वजन गटात सुवर्ण पदक
दिव्या बारी 13 वर्ष आतील 25 ते 30 किलो वजन गटात सुवर्ण पदक
गोविंद खजूरे 19 वर्ष वरील 61 ते 65 किलो वजन गटात सुवर्ण पदक
सोहम नेहेते 12 वर्ष आतील 51 ते 55 किलो वजन गटात रौप्य पदक
यशार्थ भोकरिकर 12 वर्ष आतील 21 ते 25 किलो वजन रौप्य गटात पदक
या स्पर्धेत सुवर्ण पदक, रौप्य पदक, कांस्य पदक पटकविले व जळगाव जिल्हाचे नाव राष्ट्रीय स्तरावर लवलवकित केले. विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक निलेश सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. असोसिएशन सचिव पूजा सोनवणे, उपाध्यक्ष दिनेश थोरात, खजिनदार अरविंद जाधव यांनी सहकार्य केले.