एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची तरुणाने निर्घृण हत्या केली. हातोड्याने वार करत तरुणाने विद्यार्थिनीचा जीव घेतल्याचा आरोप आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिरामणटोला येथे घडली आहे. दुर्गाप्रसाद गणेश रहांगडाले असं आरोपीचं नाव आहे.
आरोपी कित्येक वर्षांपासून प्रेमासाठी तरुणीच्या मागे तगादा लावत होता, मात्र तिने काहीच उत्तर न दिल्यामुळे संतापून त्याने तिची हत्या केल्याचा दावा केला जात आहे. हत्येनंतर हातोडीने वार करत आरोपीने स्वतःलाही जखमी करुन घेतले होते, मात्र लोकांनी आरोपीला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले.
एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची तरुणाने निर्घृण हत्या केली. 18 वर्षीय तरुणीच्या डोक्यावर हातोडीने वार करुन तिचा जीव घेण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिरामणटोला येथे घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
ट्यूशनवरुन परत येत असताना काळ आपली रस्त्यात वाट पाहत आहे, याची पुसटशी कल्पनाही तिला नव्हती. आरोपी कित्येक वर्षांपासून प्रेमासाठी तिच्यामागे तगादा लावत होता, मात्र तरुणीकडून या एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून संतापलेल्या आरोपीने हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
हत्या केल्यानंतर आरोपीला गावातील लोकांनी घेराव घातला. लोकांचा जमाव पाहता आरोपीने स्वतःवरही हातोडीने वार करत जखमी करुन घेतले होते, मात्र लोकांनी आरोपीला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून पुढील तपास रावणवाडी पोलिस करत आहेत.