छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमच्या अडचणीत वाढ झाली आहे. छिंदम याच्या विरोधात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. फोनवरून शिवीगाळ करणारा आवाज हा श्रीपाद छिंदम याचाच असल्याचा अहवाल फॉरेन्सिक लॅबने दिला आहे. 2018 च्या फेब्रुवारी महिन्यात छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केलं होतं.
मिलालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदम याच्याविरोधात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तसेच 2018 साली व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमधील आवाजही छिंदम याचाच असल्याचे समोर आले आहे. तसा अहवाल फॉरेन्सिक लॅबने दिला आहे. या सर्व गोष्टीमुळे छिंदम याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
श्रीपाद छिंदम याने फेब्रुवारी 2018 मध्ये अहमदनगर महानगरपालिकेचे अधिकारी अशोक बिडवे यांना फोन केला होता. बिडवे त्यावेळी महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी होते. यावेळी छिंदम याने बिडवे यांना फोनवर शिवीगाळ केली. तसेच पुढे बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. याच वक्तव्याची कॉल रेकॉर्डिंग नंतर समोर आली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर समस्त महाराष्ट्रातून छिंदम याच्याविरोधात रोष व्यक्त केला जात होता. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.