हिंगोलीच्या राज्य महामार्गावर घडलेल्या एका विचित्र अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. येथील सेनगावनजीक हा प्रकार घडला. या मार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. मात्र, या पूलाचे काम बऱ्याच काळापासून रखडले आहे. या पुलासाठी एक खड्डा खोदण्यात आला होता.
हा खड्डा महामार्गावरच असूनही त्याठिकाणी कोणताही धोक्याचा फलक लावण्यात आला नव्हता. त्यामुळे कार थेट या खड्ड्यात जाऊन कोसळली. हा खड्डा पाण्याने भरलेला होता. त्यामुळे पाणी थेट गाडीतील लोकांच्या नाकातोंडात गेले. परिणामी सर्वांचा मृत्यू झाला. चौघेही मृत लोणार तालुक्यातील खळेगाव, पळखेडा येथील रहिवासी आहेत.