शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणं
हा नियोजित कटाचा भाग
लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणं हा विचारपूर्वक केलेल्या नियोजित कटाचा भाग होता, असं या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) म्हटलं आहे. या प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाच्या प्रमुखांनी न्यायाधीशांना याबाबत चिट्ठी लिहिली आहे. यात आशीष मिश्राविरोधातील आरोप दुरुस्त केले पाहिजे असं म्हटलं आहे. आशीष मिश्रा आणि त्याचे इतर सहकारी हत्या आणि कटाच्या आरोपांचा सामना करत आहेत. हत्येचा प्रयत्न आणि काही गंभीर आरोपांचा समावेश करण्याची शिफारस या एसआयटीने केली आहे.
हाय रिस्क’ देशांतून येणाऱ्यासाठी
RT-PCR पूर्व नोंदणी बंधनकारक
ओमायक्रॉनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्राने ‘हाय रिस्क’ देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी त्यांच्या RT-PCR चाचणीसाठी पूर्व नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. ज्या प्रवाशांनी त्यांच्या चाचण्यांची आधीच नोंदणी केलेली नाही त्यांना त्यांच्या विमानामध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल. अशा प्रवाशांच्या चाचण्यांची नोंदणीची जबाबदारी संबंधित विमान कंपन्यांची असेल.
लहान मुलांसाठीची लस सहा
महिन्यांत लाँच करणार : पूनावाला
लहान मुलांसाठी असलेली आमची कोवावॅक्स ही व्हॅक्सिन सध्या चाचणी स्तरावर आहे. पण तिच्या चाचण्यांचे अतिशय उत्तम निष्कर्ष दिसत आहेत. अगदी ३ वर्षे वयाच्या मुलांवर देखील या लसीची चाचणी करण्यात आली आहे. चाचण्यांमधून येणाऱ्या निष्कर्षांचा विचार करता लहान मुलांसाठीची आमची लस येत्या सहा महिन्यांत लाँच केली जाईल”, असं अदर पूनावाला म्हणाले.
जसे फीड केले जाते माध्यमे
तसेच छापतात : राज ठाकरे
राज ठाकरे म्हणाले, “आपण मूळ विषय ठेवतोय बाजूला आणि नको त्या सगळ्या विषयात सगळं प्रकरण फिरवलं जातं. तुम्हाला(माध्यमांना) जे फीड येत त्यानुसार तुम्ही छापता, परंतु शेवटी तुमचाही वापरच केला जातोय. उदाहरणार्थ आर्यन खान प्रकरण जवळपास २८ दिवस सुरू होतं. ज्या दिवशी बाहेर पडला त्यानंतर कोणी विचारलं देखील नाही, सध्या कसा आहे? तोपर्यंत जोरात सगळ्या गोष्टी सुरू होत्या. सुशांतसिंग प्रकरण त्यानंतर अंबानीच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला त्याचं काय झालं पुढे माहीत नाही…शेवटी तुमचाही कुठतरी वापर केला जातोय आणि त्यामधून या सर्व गोष्टी घडत आहेत. मूळ विषय राहतात बाजूला. परवाची लोकसभेत जी बातमी सांगितली गेली की पाच लाख व्यावसायिकांनी देश सोडला. यावर आपल्याकडे चर्चा होत नाही. पण हे पाच लाख जण गेले कुठे? याचा शोध घ्यावा असं कोणालाही वाटत नाही.
अनिल देशमुख यांनी कधीही
पैशांची मागणी केली नाही : वाझे
१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचार्यांनी कधीही पैशांची मागणी केलेली नाही. देशमुखांनी वसुलीचे कोणतेही टार्गेट दिले नव्हते, असे निलंबित पोलीस सचिन वाझे यांनी मंगळवारी राज्याने नियुक्त केलेल्या एका सदस्याच्या उच्चस्तरीय चौकशी समितीला सांगितले. बारमालक किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांकडूनही आपण देखील कधीही पैसे घेतले नसल्याचा दावाही वाझेंनी केला.
खासदारांचं निलंबन हे शेतकरी
आंदोलनासाठी मोठं बलिदान : राऊत
खासदारांचं निलंबन हे शेतकरी आंदोलनासाठी मोठं बलिदान असल्याचं यावेळी संजय राऊत म्हणाले. “२ आठवड्यांपासून हा संघर्ष सुरू आहे. हे फक्त १२ खासदारांचं निलंबन नाही. मी मानतो की शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी आमच्या खासदारांचं हे सर्वात मोठं बलिदान आहे. सरकार ऐकायला तयार नाही. आज जेव्हा आम्ही सकाळपासून सदनात आंदोलन सुरू केलं, तेव्हा आमची मागणी होती लोकशाही वाचवा आणि आम्हाला न्याय हवा. पण लोकशाही आणि न्याय हे शब्द सरकारला ऐकायचे नाहीत”, असं राऊत म्हणाले.
उद्यापासून मुंबईत
शाळा सुरू होणार
मुंबईत उद्या (१५ डिसेंबर) पासून इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होत आहेत. कोविड विषयक नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने या संदर्भात माध्यम परिपत्रक काढण्यात आलेले आहे.
गाईच्या रक्षणासाठी तलवारी
हातात घ्याव्यात : साध्वी सरस्वती
भाजपा आणि विश्व हिंदू परिषदेचं गाईंवर असलेलं प्रेम सर्वांनाच माहित आहे. गाईचे महत्व सांगत गाईला राष्ट्रीय पशू घोषित करण्यात यावं, अशी मागणीही अनेकदा करण्यात आली आहे. गाईमध्ये ३३ कोटी देवता असतात, तसेच गाईपासून मिळणाऱ्या पदार्थांचा वापर करून पंचामृत तयार करण्यात येतं, गाईला राष्ट्रीय पशू घोषित केलं जावं, अशी मागणी सातत्याने केली जाते. अनेक राज्यांमध्ये तर गाईंच्या रक्षणासाठी गोहत्या कायदा देखील आहे. गाईच्या रक्षणासाठी लोकांनी तलवारी हातात घ्याव्यात, असं विधान विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वती यांनी केलंय.
मदर टेरेसा यांच्या संस्थेविषयी
धर्मांतराचा आरोप
गुजरातमध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या ख्रिश्चन संस्थेवर धर्मांतराचा आरोप करण्यात आला आहे. ही संस्था मदर तेरेसा यांनी स्थापन केली होती. या धर्मांतराप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या बालसुधारगृहात राहणाऱ्या मुलींना ख्रिश्चन बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वडोदरा शहरातील या बालगृहाविरोधात गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा, २००३ अन्वये हिंदू धार्मिक भावना दुखावल्याचा आणि अल्पवयीन मुलींना ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
SD social media
9850 60 3590