कोरोना काळात रेल्वेकडून सातत्याने सेवा वाढवली आहेत. सध्या जरी सामान्य दिवसांच्या तुलनेत रेल्वे गाड्या कमी धावत असल्या तरी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर रेल्वेची संख्या ही वाढवली जाईल, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कोरोनापूर्वी सर्वसाधारण 500 रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांची होत होत्या. मात्र कोरोनामुळे सध्या केवळ 314 रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या सुरु आहेत.
कोरोना काळात पूर्व मध्य रेल्वे विभागात 307 जोड्या मेल / एक्स्प्रेस गाड्या आणि 190 प्रवासी रेल्वेगाड्या चालवल्या जात होत्या. तर सध्या मेल / एक्स्प्रेसच्या 279 जोड्या आणि 35 प्रवासी गाड्या चालवल्या जात आहेत. येत्या काही दिवसात या प्रवासी गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
ECR चे CPRO राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व मध्य रेल्वेमार्फत सध्या चालवल्या जाणाऱ्या प्रवासी गाड्यांव्यतिरिक्त उर्वरित प्रवासी गाड्या विविध मार्गांवर चालवण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडे प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाकडून या प्रस्तावाला मान्यता मिळताच प्रवासी गाड्यांची संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे सर्व रेल्वेचे डब्बे आरक्षित ठेवले जाणार आहे. यामुळे कोरोना संसर्ग रोखता येणे शक्य होईल. तसेच जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत अनारक्षित प्रवासी विशेष गाड्या सोडल्या जातील.
राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या आरोग्याची काळजी हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे सध्या आधीच्या तुलनेत कमी प्रवासी गाड्या चालवल्या जात आहे. सध्या कोरोना लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. यामुळे मोठ्या संख्येने नागरिक लस घेत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. यानंतर काळानुसार विशेष रेल्वे गाड्यांची संख्या वाढवली जाणार आहे.