एल आय सी च्याखुल्या भागविक्रीद्वारा निर्गुंतवणूक मान्यता

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशातील सर्वात मोठी मोठी विमा कंपनी -भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या प्रारंभिक खुल्या भागविक्रीद्वारा निर्गुंतवणूक मान्यता दिली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती एलआयसीमधील भागभांडवल विक्रीचे प्रमाण ठरवेल. सुरुवातीच्या सार्वजनिक ऑफरपूर्वी (आयपीओ) एलआयसीचे मूलभूत मूल्य पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (DIPAM) मिलिमॅन अ‍ॅडव्हायझर्स एलएलपी इंडिया या कंपनीची नेमणूक केली आहे.

LIC चे खासगीकरण हे भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठे पाऊस आहे. काही दिवसांपूर्वी एलआयसी कायद्यात अर्थसंकल्पीय सुधारणांना अधिसूचित करण्यात आले आहे. त्यानुसार अ‍ॅक्ट्युअरी कंपनी जीवन विमा कंपनीचे मूळ मूल्य निश्चित करेल. या मूलभूत मूल्य विमा कंपनीद्वारे भविष्यातील नफ्याचे सध्याचे निव्वळ मालमत्ता मूल्यामध्ये समाविष्ट केले जाईल.

केंद्रीय मंत्रिमंडळाने एलआयसीच्या प्रारंभिक खुल्या भागविक्रीला (IPO) मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे. कॅबिनेट कमिटी ऑन इकोनॉमिक अफेअर्सकडून (CCEA) या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे निर्गुंतवणुकीबाबत पर्यायी व्यवस्था करून भागधारक विक्रीचे प्रमाण सरकार ठरवेल. ”एलआयसीचा आयपीओ चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस येऊ शकेल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

यानुसार LICच्या आयपीओचा 10 टक्के हिस्सा हा पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवला जाईल. हा आयपीओ बाजारपेठेत आल्यानंतरही एलआयसीमधील सर्वाधिक भागीदारी ही केंद्र सरकारकडेच असेल. मात्र, हा आयपीओ बाजारपेठेत आणण्यापूर्वी केंद्र सरकारला कायद्यात काही सुधारण करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने यंदाच्या वर्षात सरकारी बँका आणि संस्थांच्या खासगीकरणाच्या माध्यमातून 1,75,000 कोटी रुपयांची भांडवल उभारणी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.