‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

प्रविण विठ्ठल तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. प्रविण तरडे यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘सरसेनापती हंबीरराव’ लवकरचं चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. आता हा चित्रपट कधी रूपेरी पडद्यावर झळकतो याच प्रतीक्षेच चाहते आहेत. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

चित्रपटाचा टीझर अभिनेता गश्मीर महाजनीने शेअर केला आहे. गश्मीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करत गश्मीरने कॅप्शनमध्ये “सरसेनापती हंबीरराव” हा केवळ एक चित्रपट नाही , तर आपल्या दोन्ही छत्रपतींशी निगडीत एक पवित्र भावना आहे.. असे कितीही लॅाकडाऊन आले तरी ही भावना व्यक्त होणार चित्रपटगृहातच.. लवकरच.. पण त्या आधी आजच्या या पवित्र पावन दिवशी तुमच्या आमच्या महाराजांचे हे सिंहासनाधिश्वर दर्शन !’ असं लिहिलं आहे.

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात कोण कोणती भूमिका साकारणार हे अद्याप कळू शकलेलं नाही. फक्त गश्मीरच्या भूमिकेबद्दल माहिती मिळाली आहे. इतिहासात हंबीरराव मोहिते यांचा जीवनप्रवास काही तुकड्यांमध्ये अनुभवला आहे. तसेच झी मराठीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतील हंबीर मामा देखील प्रेक्षकांनी अनुभवले. मात्र आता हंबीरराव मोहिते यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.