लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री जन्नत झुबैर हिने अगदी लहान वयात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि चाहत्यांसाठी व्हिडीओ व फोटो शेअर करत राहते. जन्नतने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात 2009पासून केली होती. बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी जन्नत आता कोट्यवधींच्या मालमत्तेची मालकीण बनली आहे
अभिनेत्री होण्याव्यतिरिक्त ती एक मॉडेल आणि कलाकार देखील आहे. इतक्या लहान वयात ती इंडस्ट्रीतील सर्वात बक्कळ कमाई करणारी अभिनेत्री आहे. जन्नतला जगभरातील तरुणाईकडून खूप प्रेम मिळते आहे. सोशल मीडियावर कोट्यावधी लोक तिला फॉलो करतात.
कॅकनॉज डॉट कॉमच्या अहवालानुसार जन्नत झुबैर या वयातच तब्बल 7 कोटींच्या मालमत्तेची मालकीण आहे. ही सर्व संपत्ती जन्नतने तिच्या व्यवसायात कष्ट करून मिळवली आहे. अगदी लहान वयातच ती एक यशस्वी अभिनेत्री बनली आहे.
अभिनयाव्यतिरिक्त, जन्नत बर्याच ब्रँडसाठी काम करते आणि अँडॉर्स करते. ज्यामुळे तिची संपत्ती लक्षणीय वाढली आहे.