महाराष्ट्रातल्या दोन वाघिणी गुजरातला जाणार
औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यानामध्ये असलेल्या 14 वाघांपैकी रंजना आणि प्रतिथा या दोन वाघिणी गुजरातला पाठवल्या जाणार आहेत. गुजरात येथील अहमदाबादच्या कमला नेहरू प्राणी संग्रहालयामध्ये दोन वाघिणींना पाठवण्यात येणार आहे. या दोन्हीं वाघिणी शांत आणि संयमी असल्याचं या ठिकाणी त्यांची काळजी घेणारे मोहम्मद जिया यांनी सांगितलं आहे.औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या शेजारी सिद्धार्थ उद्यान आहे. या उद्यानामध्ये असलेले पक्षी, प्राणी आणि खेळाच्या साहित्यामुळे लहानांपासून मोठ्यांमध्ये या उद्यानाच आकर्षण आहे. या ठिकाणी असलेले वाघ हे सर्वच नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. सिद्धार्थ उद्यानामध्ये सध्या 14 वाघ आहेत. 2020 ला औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये जन्मलेल्या रंजना आणि प्रतिथा या दोन वाघिणी आता 26 महिन्यांच्या झाल्या आहेत.
उद्धव ठाकरेंचं बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल, वडिलांनी 55 वर्षांपूर्वी केलं त्याचीच पुनरावृत्ती
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी तातडीची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली.
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मिळाल्यानंतर शनिवारी मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या गर्दीला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं. कारच्या छपराबाहेर येत उद्धव ठाकरेंनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली. धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरं जाऊन दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि भाजपला दिलं. उद्धव ठाकरे भाषण करत असताना मातोश्रीबाहेर रस्त्यावर आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, भास्कर जाधव, सुषमा अंधारे आणि प्रियांका चतुर्वेदी हे नेते आणि शिवसैनिक उपस्थित होते.
24 वर्षे फक्त एका फळावर जगतेय ही व्यक्ती; आजारातूनही ठणठणीत झाल्याचा दावा
आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्या शरीराला वेगवेगळ्या घटकांची गरज असते. त्यासाठी आपल्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करावा लागतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक व्यक्ती जी गेली 24 वर्षे फक्त एकाच फळावर जगते आहे. इतकंच नव्हे तर ही व्यक्ती एका समस्येने त्रस्त होती ती समस्याही दूर झाली आणि आता आपण हेल्दी आणि फिट असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे.
बालाकृष्णन असं या व्यक्तीचं नाव आहे. हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लोक काय काय नाही करत. खास डाएट फॉलो करतात. एक्सरझाइझ करतात. पण बालाकृष्णन यांनी स्वतःसाठी एक खास डाएट बनवला आहे.
आज महिला टी 20 वर्ल्ड कप मध्ये भारत इंग्लंडशी भिडणार
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी 20 वर्ल्ड कप मध्ये आज भारतीय संघ इंग्लंडच्या संघाशी भिडणार आहे. आज या स्पर्धेतील भारताचा हा तिसरा सामना असून यापूर्वी भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. तर इंग्लंडने देखील आयर्लंड सोबतच्या सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला होता. आजच्या सामन्याकडे क्रिकेटजगताचे लक्ष लागले असून या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या दरम्यान महिला टी 20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यंदा वर्ल्ड कप स्पर्धेत 10 संघांचा सहभाग असून यांचे दोन ग्रुपमध्ये विभाजन करण्यात आले आहे. यातील ग्रुप B मध्ये इंग्लंड, आयर्लंड, वेस्टइंडीज सह भारत आणि पाकिस्तान या संघांचाही समावेश आहे. वेस्ट इंडिजला नमवून वर्ल्ड कपमध्ये दमदार आगेकूच केलेल्या भारताला स्पर्धेतील आपले स्थान अधिक भक्कम करण्यासाठी इंग्लंड विरुद्धचा सामना जिंकणं आवश्यक आहे. तेव्हा आवश्यकतेनुसार भारतीय संघाच्या प्लेयिंग 11 मध्ये बदल होऊ शकतो.
काँग्रेसचा आणखी एक बालेकिल्ला ढासळला, अमूल डेअरीवर भाजपाची सत्ता
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने १५६ जागा जिंकत मोठा विजय संपादन केला. या विजयाने भाजपाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. विधानसभा निकालानंतर भाजपाने गुजरातमधील आणि देशातील पहिल्या अमूल दूध डेअरीकडे आपला मोर्चा वळवला. १९४६ साली भारतातील पहिली डेअरी सहकारी संस्था म्हणून अमूलची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून अमूल दूधसंघावर काँग्रेसची एकहाती सत्ता होती.यामुळे अमूल वगळता गुजरातमधील १८ दूध सहकारी संस्था १०० टक्के भाजपाच्या ताब्यात आहेत. अमूल ही एकमेव डेअरी सहकारी संस्था आहे, ज्यात काँग्रेसचे काही सदस्य बाकी आहेत. इतर दूधसंघात १०० टक्के भाजपाचे सदस्य आहेत.
भाजपातील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाने अमूल डेअरीवर आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक काम केले. त्यांनी अमूलच्या बोर्डवर असणाऱ्या काँग्रेसच्या पाच नेत्यांना भाजपामध्ये आणलं. त्यानंतर मंगळवारी अखेर भाजपा नेते विपुल पटेल यांची सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी आणि काँग्रेसमधून नुकतंच भाजपावासी झालेल्या कांती परमार सोढा यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
दक्षिण अफ्रिकेतून भारतात आले आणखी १२ चित्ते, ग्वाल्हेरमध्ये उतरलं वायुसेनेचं विमान
ग्वाल्हेर या ठिकाणी १२ आणखी चित्ते पोहचले आहेत. दक्षिण अफ्रिकेतून आणण्यात आलेले हे पाहुणे आता भारतात वास्तव्य करणार आहेत. या चित्त्यांना भारतीय वायुसेनेच्या गॅलेक्सी ग्लोबमास्टर सी १७ या विशेष विमानातून भारतातल्या ग्वाल्हेर या ठिकाणी आणण्यात आलं आहे. विशिष्ट बॉक्समधून हे चित्ते भारतात आणले गेले आहेत.या १२ चित्त्यांना मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहे. याआधीही चित्ते भारतात आणले आहेत. भारतातली चित्त्यांची संख्या वाढावी या अनुषंगाने दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात एक करार झाला होता. याआधी ८ चित्ते भारतात आणले गेले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात १२ चित्ते आणले गेले आहेत.
१००व्या कसोटीत रोहित शर्माने केला पुजाराचा अपमान! भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने व्यक्त केली नाराजी
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचाभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाचा दिग्गज कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्यासाठी हा त्याचा १००वा कसोटी सामना आहे. शुक्रवारी अरुण जेटली स्टेडियमवर पाय टाकताच पुजाराने स्वतःचे १०० कसोटी सामने पूर्ण केले. पण रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळताना पुजारासोबत या सामन्यात चुकीचे वर्तन झाले, असे माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीर याने म्हटले आहे.चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना भारताने एक डाव आणि १३२ धावांनी जिंकला होता. शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) सुरू झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली आणि प्रथम गोलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात चेतेश्वर पुजारा स्वतःचा १००वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. पण गौतम गंभीर याच्या मते रोहितने त्याला चुकीच्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी उभे केले. गंभीरच्या मते पुजारासारख्या वरिष्ठ खेळाडूला शॉर्ट लेगवर म्हणजेच खेळपट्टीच्या अगदी जवळ उभा करणे योग्य नव्हते.
SD Social Media
9850 60 3590