गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात नक्षलविरोधी अभियान गडचिरोली पोलीस नेहमी राबवित असतात. एटापल्ली तालुक्यातील हालेवारा कुंदरी जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असताना जंगलात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले सोळा लाख रुपये, नक्षल साहित्य गडचिरोली सी 60 पोलीस पथकांच्या हाती लागले.
या डंपमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा सोळा लाख रुपये पोलिसांनी जप्त केले व काही नक्षल साहित्यासह नक्षली बॅनर पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी नक्षलविरोधी केलेली ही मोठी यशस्वी कारवाई यावेळी पाहायला मिळाली.
पोलीस विभागाच्या नक्षलवादी विरोधी c60 जवानांनी नक्षलवाद्यांनी पुरलेल्या 15 लाख 96 हजार रुपये तसंच स्फोटक साहित्य जप्त केलं. गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली.
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी केलं जाणारे बांधकाम, रोजगार, तेंदूपत्ता ठेकेदार, सामान्य नागरिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल करून ती रक्कम जिल्ह्यात हिंसक कारवाया करण्यासाठी लागणारं शस्त्र, साहित्य, दारुगोळा खरेदी करण्यासाठी नक्षलवादी वापरत असतात. ते जमा करून सर्व पैसा शस्त्र, साहित्य, दारूगोळा ते गोपनीयरित्या ठेवतात.
1 जुलै रोजी पोलिसांनी नक्षलवाद्यांनी पुरून ठेवलेले 15 लाख रुपये, इलेक्ट्रिक बटन, एक स्वीच, तीन डेटोनेटर, दोन वायर बंडल, एक वॉकी टॉकी, नक्षल पॅम्पलेट बॅनर, आणि इतर साहित्य पोलिसांनी जमा केलं. तसंच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आणखी सुरु आहे.