राज्यात Weekend Lockdown सुरु, अत्यावश्यक सेवा सुरु राहणार

महाराष्ट्र सरकारने सर्वच जिल्ह्यांतील निकष तिसऱ्या वर्गात (Third Level) आणल्यामुळे शनिवार आणि रविवार (Saturday and Sunday) राज्यातील बहुतांश शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन (Weekend lockdown) असणार आहे. साताऱ्यामध्ये शनिवारपासून आठ दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, नाशिक, वसई-विरार या आणि इतर महापालिका क्षेत्रातही कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

नव्या नियमानुसार लॉकडाऊन

राज्य सरकारनं पॉझटीव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी असणाऱ्या आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता 75 टक्क्यांपेक्षा जास्त असणाऱ्या शहरांना आणि जिल्ह्यांना विकएंड लॉकडाऊनमधून वगळण्याचा निर्णय़ सुरुवातीला घेतला होता.

मात्र त्यानंतर तीनच आठवड्यात हे नियम बदलण्यात आले. पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाचे निकष रद्द करून थेट तिसऱ्या वर्गापासूनचे निकष लावण्यात आले. तिसऱ्या वर्गातील निकषांमध्ये आठवड्यातील पाच दिवस दिलासा आणि शनिवार-रविवार लॉकडाऊन असा नियम असल्यामुळे ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. तिथंदेखील वीकएंड लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर या एकमेकांना लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असल्यामुळे तिथे विकएंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सांगलीमध्ये तर 5 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा अगोदरच करण्यात आली आहे. पुण्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. विदर्भात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी विकएंड लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.