टीम इंडियाचा कोच होणार राहुल द्रविड

भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असणारा राहुल द्रविड (Rahul Dravid) लवकरच टीम इंडियाचा (Team India) कोच होणार आहे. राहुल द्रविड सध्या बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीचा (NCA) संचालक आहे. तो यापूर्वी टीम इंडियाच्या अंडर-19 टीमचा कोच होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने अंडर-19 वर्ल्ड कप देखील जिंकला आहे. टीम इंडियाच्या नव्या पिढीतील बहुतेक सर्व खेळाडू द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत.

कधी होणार कोच?

राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच होणार असला तरी तो विद्यमान कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची जागा घेणार नाही.

टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. ( India tour of Sri Lanka 2021) प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये ‘संपूर्ण नवी टीम इंडिया’ श्रीलंकेला जाणार आहे. या टीमचा कॅप्टन अजूनही नक्की नाही. शिखर धवन, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि श्रेयस अय्यर ही चार नाव कॅप्टनपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. मात्र टीमचा कोच राहुल द्रविड असेल, असं बीसीसीआनं निश्चित केल्याची माहिती ANI नं बीसीसीआयच्या सुत्रांच्या आधारे दिली आहे. श्रीलंका दौऱ्याच्या वेळी रवी शास्त्रीसह संपूर्ण कोचिंग स्टाफ हा इंग्लंडमध्ये असेल. त्यावेळी नव्या टीमला प्रशिक्षण देण्यासाठी राहुल द्रविड हेच योग्य नाव असल्याची माहिती या सूत्रांनी दिली आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 3 वन-डे आणि 3 टी 20 मॅचची सीरिज होणार आहे. या दौऱ्यातील वन-डे मॅच 13, 16 आणि 19 जुलैला होणार असून टी 20 मॅच 22 ते 27 जुलैच्या दरम्यान अपेक्षित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.