श्रेया बुगडे, निखील या लव्हबर्ड्सची लव्हस्टोरी

छोट्या पडद्यावरील रसिकांना खळखळून हसवणारा आणि दिलखुलास मनोरंजन करणारा शो म्हणजे चला हवा येऊ द्या. अल्पावधीतच हा शो रसिकांचा लाडका शो बनला. शोमधील विनोदवीरांनी थुकरटवाडीत अशी काही धम्माल केली की ती रसिकांना भावली. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, डॉ. निलेश साबळे. चला हवा येऊ द्या शोमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रत्येक विनोदवीर हसवत असतो. या विनोदवीरांमध्ये श्रेया बुगडेही काही मागे नाही. हटके भूमिका साकारुन रसिकांचं मनोरंजन करते. त्यामुळेच श्रेया अल्पावधीच रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे.
श्रेयाच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याची रसिकांमध्ये उत्सुकता असते. श्रेयाचा जन्म हा पुण्यात एका मराठी कुटुंबात झाला असला तरी ती एका गुजराती कुटुंबाची सून आहे. 27 डिसेंबर 2015 रोजी श्रेया आणि निखील सेठ यांचा विवाह संपन्न झाला होता. श्रेया आणि निखील यांचे लव्ह मॅरेज आहे. एका मालिकेच्या शुटिंग दरम्यान या दोघांची भेट झाली. या मालिकेच्या सेटवर निखील श्रेयाशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत असे.

मात्र काही तरी दोघांमध्ये बिनसलं आणि वाद झाला. त्यामुळे दोघं एकमेकांपासून दूर गेले होते. मात्र त्यांच्यातला हा दुरावा काही फार काळ राहिला नाही. कारण एका गाजलेल्या मराठी मालिकेचा कार्यकारी निर्माता अशी निखीलच्या नावाची क्रेडिट लाईन श्रेयाने पाहिली आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला.

यानंतर दोघांमध्ये पुन्हा एकदा संवाद सुरु झाला. त्याच काळात निखीलच्या घरी त्याच्या लग्नाची तयारी सुरु होती. त्यामुळे निखीलने श्रेयाला तू सिंगल आहेस का अशी विचारणा केली. त्यावर श्रेयाने हो असं उत्तर देताच निखीलने फार वेळ न दवडता तिला प्रपोज केले.
श्रेयानेही त्याला हो असं उत्तर दिलं. यानंतर कुटुंबीयांच्या सहमतीने दोघांचं लग्न जुळलं. निखीलसाठी हे लव्ह ऍट फर्स्ट साईट होते. मात्र श्रेयासाठी तसं नव्हते. मात्र आज दोघांचा सुखी संसार सुरु असून दोघं एकमेंकांसह खुश आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.