अकोला जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन अर्ज सादर झाला नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील पोटनिवडणुकीसाठी 5 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे.
3 वर्षांपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील आरक्षणाचा मुद्दा न्याय प्रविष्ट झाला होता. आरक्षणाची टक्केवारी 50 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांकडून सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आला. डिसेंबर 2018 मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात असल्याने शासनाने पुढील आदेशापर्यंत मुदत वाढ दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून 2020 मध्ये निवडणुका झाल्या. मात्र 4 मार्च रोजी न्यायालयाने अंतिम निर्णय देत ओबीसी-नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण 27 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, असे स्पष्ट केल्याने त्या जागाच रिक्त झाल्या होत्या.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील पोटनिवडणुकीसाठी 5 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. अन्यबाबी पुढील प्रमाणे होणार आहेत.
1) जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी व त्यावर निर्णय देण्यात येईल आणि वैध उमेदवारांची यादीही प्रकाशित हाेईल….
2)09 जुलै रोजी जिल्हा न्यायाधिशांकडे अपील करता येईल….
3)12 जुलै रोजी न्यायाधिश निकाल देणार आणि उमेदवारी अर्ज मागे घेता येईल व चिन्हाचे वितरण हाेईल….
4) 14 जुलै रोजी उमेदवारी अर्ज दुपारी 3 पर्यंत मागे घेता येईल….
5) 19 जुलै रोजी मतदान होणार….
6) 20 जुलै रोजी मतमोजणी होईल….
7) 23 जुलै रोजी विजयी सदस्यांची नावे जाहीर होणार….