बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यात आले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिने याबाबत माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगनाला पासपोर्टच्या नूतनीकरणाची चिंता होती, पण आता तिची समस्या दूर झाली आहे. तिने ही पोस्ट शेअर करून सांगितले आहे की, आता ती लवकरच धकडच्या शूटिंगसाठी परदेशात जाणार आहे.
‘धाकड’च्या दिग्दर्शकासमवेत एक फोटो शेअर करुन कंगनाने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘मला माझा पासपोर्ट मिळाला आहे. आपली काळजी आणि शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. मुख्य म्हणजे मी लवकरच तुझ्याबरोबर असणार आहे.’ कंगनाला पासपोर्ट मिळाल्यानंतर तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. त्याने कंगनाच्या या पोस्टवर कमेंट करून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कंगनाच्या या पोस्टवर एका फॅनने कमेंट केली की, ‘ऑल द बेस्ट क्वीन कंगना.’ तर दुसर्या फॅनने लिहिले की, ‘अभिनंदन’. तिच्या हजारो चाहत्यांना कंगनाची ही पोस्ट आवडली आहे.
सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात कंगना रनौतच्या पासपोर्ट नूतनीकरणाच्या सुनावणीत कोर्टाने पासपोर्ट प्राधिकरणाच्या बाजूने निकाल दिला होता. त्यांनी म्हटले होते की, कंगनाच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी पासपोर्ट प्राधिकरणाची आहे.
आगामी ‘धाकड’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कंगनाला बुडापेस्टला जावे लागणार होते. ज्यासाठी तिला पासपोर्टचे नूतनीकरण करणे आवश्यक होते. त्यानंतर कंगनाने मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. परंतु, कोर्टानेही या प्रकरणाचा निर्णय पासपोर्ट प्राधिकरणावर सोडला होता.