तुकाराम महाराज पालखी 1 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मानाचा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 1 जुलै 2021 रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार आहे. 1 जुलै 2021 ते 19 जुलै 2021 पर्यंत प्रस्थान सोहळा असेल. त्यानंतर पादुका मुख्य मंदिरात राहणार आहेत. पहाटे 4 ते 5 सर्व देवांची महापूजा करण्यात येईल. सकाळी 9 ते 12 सप्ताहाच्या काल्याचे किर्तन देवकर महाराज करतील. दुपारी 2 वाजता प्रस्थान सोहळा कार्यक्रम असेल.
1 ते 19 जुलै दरम्यान नित्याचे कार्यक्रम
पहाटे 4 ते 6 सर्व देवांची नित्य पूजा
सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत पालखी सोहळा वाटचालीचे कार्यक्रम
सायंकाळी 6 वाजता समाज आरती
सायंकाळी 9 ते 11 कीर्तन सेवा
सायंकाळी 11 नंतर शेज आरती
19 जुलै रोजी सकाळी 9 वाजता पादुका पंढरपूरकडे शासनाच्या बसने जातील. त्यानंतर 19 जुलै ते 24 जुलैपर्यंत पादुका पंढरपूरमध्ये राहतील. 24 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत पालखी पुन्हा मुख्य मंदिरात राहतील.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पंढरपूरकडे निघणार


आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2 जुलैला सायंकाळी 4 वाजता आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून केली जात आहे. पालखी सोहळ्यापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात प्रस्थान सप्ताह सुरू आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार आहे. माऊलींच्या चलपादुका विशेष वाहनाने पंढरपूरला नेल्या जाणार आहेत.

प्रस्थान कार्यक्रम 2 ते 24 जुलै वारी सोहळा


पहाटे 4 ते 5.30 : घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती
सकाळी 9 ते 11 : वीणा मंडपात कीर्तन
दुपारी 12 ते 12.30 : गाभारा स्वच्छ करणे, समाधीस पाणी घालणे व महानैवेद्य
सायंकाळी 4 : प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ
सायंकाळी 6 : माऊलींचा सोहळा मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून आजोळघरी मुक्कामी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.