काँमेडीयन सुनील ग्रोव्हरने आपल्या कॉमेडीच्या जोरावर अवघ्या देशात प्रसिध्दी मिळवली. तसेच कपिल शर्माच्या कॉमेडी शोमधून लोकांच्या मनामनात घरं केलं आहे. पण त्याच्याबाबत नुकतीच एक बातमी ईटाइम्सने दिलं आहे की, त्याच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली असून त्याची तब्येत आता स्थिर आहे. हे वृत्त व्हायरल होताचं त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चिंता व्यक्त केली असल्याची पाहायला मिळते. तसेच अनेकांनी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करणार असल्याचे सुध्दा म्हटले आहे.
अचानक पसरलेल्या या वृत्ताने संपुर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला असला आहे. सुनिल गोवरवरती मुंबईतल्या हॉस्पीटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्याची तब्येत ठिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. गेल्या आठवड्यात सुनीलने एक व्हिडीओ त्याच्या अकाऊंटवरती शेअर केला होता. तो प्रचंड व्हायरल देखील झाला होता. तेव्हापासून त्याने एकही पोस्ट अकाऊंटवरती शेअर केलेली नाही.
शस्त्रक्रियेनंतर सुनील ग्रोव्हर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. फोटोग्राफर विरल भयानी यांनी ही बातमी आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. सुनील ग्रोव्हरचा एक फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘शहरातील एशियन हॉस्पिटलमध्ये हृदय शस्त्रक्रियेनंतर सुनील ग्रोव्हर आता बरा होत आहे. तो सुखरूप असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ही बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांकडून कमेंट्सचा महापूर आला असून प्रत्येकजण त्याच्या तब्येतीचे अपडेट्स मागत आहे, त्याची प्रकृती सुधारत असून काळजी करण्याचे काहीचं कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
सुनील ग्रोव्हरने नेहमीच आपल्या चाहत्यांची आणि संपूर्ण देशाची मने जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. कपिलसोबत त्याने कधी रिंकू भाभी बनून तर कधी प्रसिद्ध गुलाटी बनून लोकांना विनोदी गुदगुल्या केल्या. तसेच कपिल शर्मासोबत झालेल्या वादानंतर सुनील ग्रोव्हरने शो सोडला होता. या प्रकरणानंतर बरीच चर्चा रंगली होती. आजही कपिल शर्मा शोचा आनंद घेणारे प्रेक्षक या शोमध्ये डॉक्टर मशूर गुलाटीला मिस करत आहेत आणि प्रत्येकजण फक्त एक दिवस शोमध्ये परत येईल या आशेवर आहे.