उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटपाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. या मुद्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने विधानपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत या मागणीला जोर दिला आहे. जेव्हा न्यायालय हस्तक्षेप झाल्याचं सांगतं तेव्हा ही बाब गंभीर आहे असंही ते म्हणाले आहेत.
कल्याणमध्ये रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा
कल्याण- कल्याण पश्चिमेतील भोईरवाडी मधील साई संजीवनी रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या आणि रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांना मारहाण करणाऱ्या आठ जणांच्या विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा संस्था हिंसाचार आणि मालमत्ता नुकसान कायद्याने सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष, राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, शिवसेनेचं काय?
राज्यात 34 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणी सुरू आहे. जवळपास बऱ्याच जिल्ह्यातील निकाल हे स्पष्ट झाले आहे. 7751 पैकी 4935 जागांचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निकालामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी हा दुसरा स्थानावर आहे. तर शिंदे गटाने तिसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेस तिसऱ्या तर शिवसेना ही पाचव्या स्थानावर आहे.
राज्यात शिंदे आणि भाजप सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरं जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाने आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीनेही कडवी टक्कर देत आहे. 34 जिल्ह्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी रविवारी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. आज या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.
बुलढाण्यात एकाच सरपंचावर तीन पक्षाचा दावा; तिघांनी सत्कार केल्याने गावकरीही हैराण
बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या लोखंडा येथे दुर्गा श्रीकृष्ण ठाकरे या सरपंचपदी थेट जनतेतून निवडून गेल्या आहेत. मात्र, या नवनियुक्त महिला सरपंचांचा काँग्रेस, भाजप त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून सत्कार करण्यात आला आहे. त्यामुळे निवडून आलेल्या महिला सरपंच कोणत्या पक्षाच्या? हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे निवडून आलेल्या एका महिला सरपंचावर तीन पक्षांकडून दावा करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे बुलढाणा जिल्ह्यातील अनेकांचे डोके चक्रावले आहे.
“मैं नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान…”, ‘भारत जोडो’ यात्रेबाबत राहुल गांधींचं विधान
काँग्रेस खासदार राहुल गांधी मागील १०० दिवसांपासून ‘भारत जोडो’ यात्रेचं नेतृत्व करत आहेत. कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर अशी ही यात्रा आहे. सध्या ही यात्रा राजस्थान मध्ये पोहोचली आहे. दरम्यान, राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेचा नेमका हेतू काय आहे? याबाबत खुलासा केला आहे. “आपण द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उभारत आहोत” असं राहुल गांधींनी सांगितलं. ते राजस्थानमधील अलवर येथे ‘भारत जोडो’ यात्रेनिमित्त आयोजित सभेत बोलत होते.यावेळी राहुल गांधी म्हणाले, “मागील १०० दिवसांपासून ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे. अनेकदा मी भाजपाच्या कार्यालयापासून गेलो. यावेळी भाजपाचे नेते, पदाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हाताची घडी घालून उभं राहतात. त्यांनाही माझ्याकडे पाहून हातवारे करायचे असतात, पण ते तसं करू शकत नाहीत. अशावेळी मी त्यांना ‘फ्लाइंग किस’ देतो. मी त्यांचा अजिबात द्वेष करत नाही. माझी लढाई त्यांच्या विचारधारेविरुद्ध आहे, पण हे लोक मला आवडतात,” असंही राहुल गांधी म्हणाले.
अशोक गेहलोत यांची मोठी घोषणा! राजस्थानमध्ये गरिबांना ५०० रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर
राजस्थानमध्ये काँग्रेसला सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. २०२४ साली विधानसभेच्या निवडणुका राजस्थानात पार पडणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गरिबांसाठी मोठी घोषणा केली आहे. राजस्थानमध्ये आता ५०० रुपयांना गॅस सिलेंडर मिळणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि नेते राहुल गांधींच्या उपस्थितीत अलवर जिल्ह्यात झालेल्या ‘भारत जोडो यात्रे’च्या सभेत गेहलोत यांनी ही घोषणा केली.
लोंगेवालाच्या लढाईतील वीर भैरोसिंह राठोड यांचे निधन
पाकिस्तानविरुद्ध १९७१ च्या युद्धात राजस्थानमधील लोंगेवाला चौकीवर अतुलनीय शौर्य दाखवणारे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) माजी सैनिक भैरोसिंह राठोड यांचे सोमवारी जोधपूरमध्ये निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.या युद्धावर आधारित १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या लोकप्रिय हिंदी चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टीने भैरोसिंह यांची भूमिका साकारली होती. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सोमवारी ‘ट्वीट’ संदेशाद्वारे जाहीर केले, की शूर भैरोसिंह राठोड यांनी आज जोधपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) अखेरचा श्वास घेतला. राठोड यांचे पुत्र सवाई सिंह यांनी सांगितले, की, त्यांच्या वडिलांची तब्येत खालावल्याने व अर्धागवायूचा झटका आल्यामुळे त्यांना १४ डिसेंबर रोजी जोधपूर येथील ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले होते.
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता! बाबर आझम आणि रमीज राजा यांच्यावर टांगती तलवार
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाबाबत काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. यापूर्वी बोर्डाच्या अध्यक्षांनी बीसीसीआयवर ज्या प्रकारे निशाणा शेअर केला आहे. पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तानने संघ पाठवू नये, असा त्यांनी उघडपणे पुनरुच्चार केल्याने ते त्यांच्यासाठी घातक ठरू शकते. या बातमीवर विश्वास ठेवला तर येत्या काही दिवसांत पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप होणार आहे.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाची अवस्था वाईट आहे. इंग्लंडने तीनही कसोटी सामने जिंकत पाकिस्तानविरुद्ध निर्भेळ यश संपादन केले. अशा परिस्थितीत पराभवानंतर बाबर आझमचे कसोटीचे कर्णधार जाऊ शकते. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा हा सलग दुसरा मालिका पराभव आहे. एकदिवसीय आणि टी२० मध्ये संघ चांगली कामगिरी करत आहे.
टीम इंडियाला पुन्हा दुखापतीचे ग्रहण!
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना २२ डिसेंबरपासून ढाका येथे खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या चाचणीसाठी अद्ययावत संघ जाहीर केला आहे. भारतीय संघाच्या पाठीमागील दुखापतींचे ग्रहण काही सुटत नाही. नियमित कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीतूनही बाहेर झाला आहे. त्याचवेळी वेगवान गोलंदाज नवदीप सैनी एकही सामना न खेळता दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडला. दुसऱ्या कसोटीत फक्त केएल राहुलच कर्णधार दिसणार आहे.
अर्जेंटिनाने फिफा वर्ल्ड कप जिंकला तरी ब्राझीलच फुटबॉल किंग
अर्जेंटिनाने 1986 नंतर 2022 मध्ये फिफा वर्ल्ड कप जिंकला. तरीही फुटबॉलमध्ये ब्राझीलच किंग ठरले आहे. या महिन्याच्या फिफा वर्ल्ड रँकिंगमध्ये ब्राझीलने त्यांचे पहिले स्थान कायम राखले आहे. ब्राझील फेब्रुवारी 2022 पासून पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी बेल्जियमला मागे टाकून पहिलं स्थान पटकावलं होतं.
क्वार्टर फायनलमध्ये ब्राझीलला वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं. त्यानतंर अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला तरी ब्राझीलला ते मागे टाकू शकले नाहीत. ब्राझीलने फिफा वर्ल्ड कपमध्ये तीन सामने जिंकले. त्यांना ग्रुप स्टेजमध्ये कॅमेरूनकडून पराभूत व्हावं लागलं. तर क्वार्टर फायनलमध्ये क्रोएशियाने त्यांचा पराभव केला.
SD Social Media
9850 60 3590