IAS अधिकाऱ्याला विधानसभेत मागावी लागली माफी; 58 वर्षानंतर पहिल्यांदा घडलंय
उत्तर प्रदेश विधानसभेने अलीकडेच एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्यासह पाच पोलिसांना विशेषाधिकार भंग प्रकरणात एक दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 15 सप्टेंबर 2004 साली आमदार सलील विश्वनोई यांना मारहाण झाली होती. या प्रकरणात या आयएएस अधिकाऱ्याचेही नाव होते. हे अधिकारी कोण आहेत? ज्यांना यूपी विधानसभेत पोलिसांसह एक दिवस तुरुंगात काढावा लागला. यूपी विधानसभेत तब्बल 58 वर्षांनंतर अशा प्रकारची शिक्षा ठोठावण्याचं प्रकरण घडलं आहे.
WPL मध्ये नेतृत्वासाठी परदेशी क्रिकेटर्सवर विश्वास, 5 पैकी 3 कॅप्टन ऑस्ट्रेलियन
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा संघ आयपीएलमधील सर्वात चर्चेत असलेला संघ आहे. या संघाने 13फेब्रुवारी रोजी महिला आयपीएलच्या लिलावात भारताची क्रिकेटर स्मृती मानधना हिला तब्बल 3. 40 कोटींना खरेदी केले. याबोलीमुळे स्मृती ही यंदाच्या महिला आयपीएलमध्ये सर्वाधिक महागडी खेळाडू ठरली. स्मृती मानधन ही एक जबरदस्त फलंदाज असून तिने भारतासाठी अनेक सामने जिंकले आहेत. स्मृतीची प्रतिभा पाहून RCB संघाने तिच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.अंबानींचा मुंबई इंडियन्स संघ महिला आयपीएल खेळण्यासाठी मोठ्या तयारीनिशी मैदानात उतरला आहे. मुंबई इंडियन्सने भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. हरमनप्रीत ही एक उत्कृष्ट फलंदाज असून ती एक बुद्धिमान कर्णधार देखील आहे. पहिली आयपीएल ट्रॉफी पटकावण्याची हरमनप्रीत आपल्या संघासोबत नक्कीच मेहेनत करेल यात शंका नाही. तिला मुंबई इंडियन्सने लिलावात 1.8 कोटींना विकत घेतले होते.अदानी यांच्या गुजरात संघाने त्यांच्या संघाचे कर्णधारपद बेथ मुनीकडे सोपवले. बेथ मुनी हिला गुजरात संघाने लिलावात 2 कोटींना विकत घेतले.मेग लॅनिंग हिच्यावर 1.1 कोटी बोली लावून दिल्ली कॅपिटलने आपल्या संघात सामील करून घेतले होते.अलिसा हिली हिला युपी वॉरिअर्सने 70 लाख रुपयांची बोली लावून खरेदी केले होते.
MIM चे खासदार इम्तियाज जलील यांच्या उपोषणस्थळी झळकला औरंगजेबचा फोटो
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णयाला केंद्र आणि राज्य सरकराने परवानगी दिली आहे. मात्र याच नामांतराच्या निर्णयाला MIM पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवत उपोषणाला बसले आहे. पण, यावेळी औरंगजेबचे फोटो झळकवण्यात आले आहे.
औरंगाबादच्या नामांतराला विरोध करत इम्जियाज जलील उपोषणाला बसले आहे. पण उपोषणस्थळी जलील समर्थकांनी औरंगजेबच्या नावाने घोषणाबाजी करत फोटो झळकावला आहे. ‘जब तक सुरज चाँद रहेंगा, औरंगजेब तेरा नाम रहेंगा’ अशा घोषणाच या समर्थकांनी दिल्या. औरंगजेबच्या घोषणाबाजी केल्यामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.आज सकाळपासून नामांतराच्या निर्णयाविरोधात जलील छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण करत आहे. हा घाणेरड्या राजकारणाचा भाग आहे. आमच्याच सरकारला या निर्णयाचं श्रेय मिळावं म्हणून, भाजप आणि शिंदे सरकराने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी उपोषण करत असल्याचं, जलील यांचं म्हणणं आहे.
उत्तराखंडमधील ‘या’ दोन जिल्ह्यात भूस्खलनाच्या सर्वाधिक घटना; देशातील १४७ जिल्हे प्रभावित
उत्तराखंडमधल्या हिमालयातील रुद्रप्रयाग आणि टिहरी घारवाल या जिल्ह्यात गेल्या दोन दशकांत सर्वाधिक भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. १९८८ ते २०२२ पर्यंत झालेल्या सुमारे ८० हजार भूस्खलनाच्या घटनांचा हैदराबादमधील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरच्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे. त्यात ही बाब समोर आली आहे. याअभ्यासासाठी इस्त्रोच्या उपग्रहाची मदत घेतली गेली.पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामानातील बदलांमुळे हा धोका वाढला आहे. १७ राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील १४७ ठिकाणं भूस्खलन प्रभावित क्षेत्र असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.
धक्कादायक! ‘स्पुटनिक व्ही’ करोना लस बनवणाऱ्या वैज्ञानिकाची गळा आवळून हत्या; व्लादिमीर पुतीन यांनी केलं होतं सन्मानित
करोनावरील स्पुटनिक व्ही ही रशियन लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांच्या चमुतील एका वैज्ञानिकाची बेल्टने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. आंद्रे बोटीकोव्ह असं या वैज्ञानिकाचे नाव आहे. याप्रकरणी २९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून घरगुती वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ४७ वर्षीय आंद्रे बोटीकोव्ह हे गमलेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अॕण्ड मॅथेमॅटिक्स येथे वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत होते. गुरुवारी ते त्यांच्या मॉस्को येथील घरात आराम करत असताना संशयित आरोपी तिथे आला. यावेळी काही घरगुती कारणांवरुन दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने रागाच्या भरात आंद्रे बोटीकोव्ह यांची बेल्टने गळा आवळून हत्या केली.
सोलापुरात महसूलमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांचा गोंधळ; घोषणाबाजी
राज्याचे महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समोर सोलापुरात कांदा दर प्रश्नावर शेतकऱ्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला तरीही शेतकरी आक्रमक होते.सात रस्त्यावरील जिल्हा नियोजन भवनात पालकमंत्री विखे-पाटील यांच्या उपस्थितीत अनेक तास विविध विकास प्रश्नांवर बैठकांवर बैठका चालू होत्या. या बैठका सुरू असतानाच नियोजन भवनात प्रवेश केलेल्या जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कांद्याच्या घसरलेल्या दराच्या प्रश्नावर घोषणाबाजी सुरू केली. विखे-पाटील यांची भेट घेण्यासाठी हे शेतकरी आंदोलक आले होते. कांदा दर प्रचंड खाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने विधिमंडळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याची ग्वाही दिली आहे.
संजय राऊतांनी केलं शरद पवारांना ‘कॉपी’, उदयनराजेंच्या संतापाचा कडेलोट!
संजय राऊत आणि उदयनराजे भोसले या दोघांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. सध्याच्या काळात पंत छत्रपतींची नियुक्ती करतात आणि छत्रपती पंतांचे चेले झाले आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी उदयनराजेंवर केली होती. संजय राऊतांच्या या टीकेला उदयनराजेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हे विकृत राजकारणी आहेत. राऊतांनी केलेलं विधान निर्लज्ज पणाचा कळस आहे, अशी टीका उदयनराजे यांनी केली आहे. आमच्या घराण्यामुळे राऊतांचा पक्ष उभा असल्याचंही उदयनराजे म्हणाले आहेत.
‘छत्रपती पेशव्यांना नेमत होते, आता पंत नेमणुका करायला लागले आहेत. हे काही महाराष्ट्राला मान्य नाही. ही स्वाभिमानाची गादी आहे, त्यांनी भाजपसोबत तडजोड केली. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाला कदापी मान्य होणार नाही,’ असं संजय राऊत म्हणाले.
‘काही विषय नसला तर या घराण्यावर बोलायचं. ज्या घराण्यामुळे आज तुमचा पक्ष उभा आहे, थोडी लाज तरी राखा,’ अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे भोसलेंनी दिली आहे.
SD Social Media
9850 60 3590