ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी भावे यांचा आज वाढदिवस

जन्म. ७ मे १९७२

मराठी कलाविश्वात ९० चा काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. अश्विनी भावे यांनी १४ व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. अश्विनी भावे यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ साली ’राजलक्ष्मी’ या चित्रपटातुन त्यांनी आपल्या करियला सुरुवात केली. त्यानंतर ’किस बाई किस’, ’अशी ही बनवाबनवी’,’कळत नकळत’, ’झुंज तुझी माझी’, ’वजीर’ यांसारखे चित्रपट केले. १९९१ साली ’हिना’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. अश्विनी लहानपणापासून ’ऋषी कपूर’ ची फॅन होत्या आणि त्यांच्या बरोबर काम करण्याची खूप इच्छा होती. ती इच्छा ’हिना’ चित्रपटाद्वारे पूर्ण झाली. ’हिना’ हा खूप गाजला. अश्विनी भावे यांनी ऋषी कपूर बरोबर ’हनिमून’ व ’मुहब्बत की आरझू’ सारखे अजूनही काही चित्रपट केले. त्यांचे ’अशान्ता’, ’सैनिक’, ’जखमी दिल’ हे चित्रपट अक्षय कुमार सोबतचे आहेत. अश्विनी भावे यांनी मीरा का मोहन, परंपरा, कायदा कानून, चौराह, इक्का राजा रानी, वापसी साजन की व युगपुरुष या चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचे दोनच चित्रपट हिट झाले, श्रीधर बरोबरचा ’भैरवी’ (१९९६) आणि जॅकी श्रॉफ बरोबरचा ’बंधन’ (१९९८). २००७ साली त्यांनी ’कदाचित’ ह्या मराठी चित्रपटामध्ये काम केले. कारकिर्दीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर असताना त्यांनी अमेरिकास्थित सॉफ्टवेअर इंजिनीयर किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केले. त्यामुळे चित्रपटांत काम करणे, बंद केले. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी चार वर्षाचा ‘अँकॅडमी ऑफ आर्ट्स युनिव्हर्सिटी’ हा कोर्स पूर्ण केला. बऱ्या वर्षांनंतर २०१७ त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पुन्हा प्रवेश केला तो एक निर्माती म्हणून. तिने निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट ’एवढंसं आभाळ.अश्विनी भावे यांनी ‘द रायकर केस’ या वेबसीरिजच्या माध्यमातून गेल्या वर्षी कलाविश्वात पुन्हा पदार्पण आहे. विशेष म्हणजे या सीरिजच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा वेबविश्वात पदार्पण केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.