‘पाकिस्तानची लोकच सुरक्षित नाहीत’, आशिया कप 2023 च्या आयोजनावर हरभजन सिंहच मोठं वक्तव्य
भारत पाकिस्तान यांच्या क्रिकेट बोर्डात सध्या आशिया कप 2023 वरून वाद सुरु आहे. यंदाच्या आशिया कप पूर्वीच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही असे सांगितले होते. तर यावर प्रत्युत्तरात पाकिस्तानचा क्रिकेट संघ देखील भारताचा दौरा करणार नाही असे पाकिस्तनाच्या क्रिकेट बोर्डाने सांगितले होते. तेव्हा दोन्ही देशांमध्ये वाद सुरु असतानाच आता भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह यांने एक मोठं वक्तव्य केलंय.
भारताचा दिग्गज क्रिकेटर हरभजन सिंह याने एका वृत्तपत्राला मुलाखत देत असताना आशिया कप 2023 विषयी आपले मत मांडले. हरभजन सिंह म्हणाला, ‘भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊ नये कारण तिथे जाणे सुरक्षित नाही. तिथल्या लोकांना आपल्याच देशात सुरक्षित वाटत नसताना आपण तिथे जाण्याचा धोका का पत्करतोय?’ बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये होणारा आशिया चषक वगळला तर भारताला त्याचा फरक पडणार नाही. पाकिस्तान क्रिकेटला भारताची गरज आहे, पण भारताला क्रिकेटसाठी पाकिस्तानची गरज नाही”, असे परखड मत हरभजन सिंह याने व्यक्त केले.
‘बावनकुळे स्पष्ट बोलणारा माणूस..’ एकनाथ खडसेंकडून भाजप नेत्याचं कौतुक; शिवसेनेला डिवचलं
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधीच भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. याला कारणीभूत ठरलंय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक विधान. आगामी विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवण्याचा भाजपचा विचार असल्याचं ते म्हणाले होते. यावर शिंदे गट आक्रमक झाला असून बावनकुळे यांना आम्ही महत्त्व देत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मात्र बावनकुळे यांचं कौतुक केलं आहे.चंद्रशेखर बावनकुळे मनमोकळ्या मनाचा आणि स्पष्ट बोलणारा माणूस आहे. बावनकुळे यांच्या कधी ओठात एक आणि पोटात दुसरं असं नाही. कार्यकर्त्यांसमोर स्पष्टपणे त्यांनी त्यांची सत्य भूमिका मांडली. यावरुन असं दिसतंय की शिवसेना शिंदे गटाकडे भाजप दुर्लक्ष करत आहे. पुढच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार भाजप करेल, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला. 288 पैकी 48 जागा ह्या शिवसेनेच्या शिंदे गटाला आणि उरलेल्या जागा भाजपाला. शिंदे गटाकडे सध्या चाळीस 42 जागा आहे. त्या लढवायच्या आणि दहा-बारा जागा निवडून आणायच्या. बावनकुळेंनी मांडलेली भूमिका स्पष्ट आहे. शिंदे गट हा महाराष्ट्रात लहानसा गट आहे, असा थेट हल्ला खडसे यांनी केला आहे.
बालाघाट जिल्ह्यातील जंगलात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, दोन पायलट ठार
बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर पोलीस ठाणे हद्दीतील भक्कुटोला गावाच्या घनदाट जंगलात शनिवारी दुपारी प्रशिक्षणार्थी चार्टर विमान कोसळले. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. एका वैमानिकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. बालाघाटचे जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक (नक्षल) आदित्य मिश्रा यांनी सांगितले की, किरणापूरच्या भक्कूटोला येथे एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांची हानी
सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस आदी तालुक्यांमध्ये काही गावांत अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या काही पिकांची हानी झाली आहे. अक्कलकोट तालुक्यात किणी गावच्या शिवारात रात्री गारपीट होऊन त्यात काढणीला आलेल्या द्राक्ष, पपई या फळबागांसह गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले. गारांचा वर्षाव सुरू होताच शेतकऱ्यांची दैना उडाली. चपळगाव, हन्नूर, चुंगी, बोरेगाव, तडवळ, नागणसूर, पानमंगरूळ, वागदरी आदी गावांमध्ये अवकाळी पावसाने शेतक-यांची झोप उडाली होती. जेऊर येथे महेश गोगावे या शेतकऱ्याने तीन एकर क्षेत्रात पपईची बाग उभारली होती.
आता नेपाळमध्ये सोलो ट्रेकिंग करण्यास बंदी; १ एप्रिलपासून लागू होणार नियम
माउंट एव्हरेस्टनंतर पाच वर्षांनी आता नेपाळ सरकारने देशभरात सोलो ट्रेकिंगवर बंदी घातली आहे. नेपाळमधील पर्वतांवर पर्यटक आणि पर्वतप्रेमींचा मोठा ओघ दिसतो जे आश्चर्यकारकपणे हिमालयातील शिखरे सर करतात. नेपाळ टुरिस्ट बोर्डाने (NTB) घेतलेला हा निर्णय 1 एप्रिलपासून लागू होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खलिस्तानी नेता अमृतपाल सिंह पोलिसांच्या ताब्यात; पंजाबमध्ये रविवारपर्यंत इंटरनेट सेवा बंद
अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याप्रकरणी शनिवार ( १८ मार्च ) खलिस्तानी नेता आणि वारिस पंजाब दे चा प्रमुख अमृतपाल सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अमृतपाल सिंह याच्यासह सह जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. ही कारवाई केल्यानंतर पंजाबमधील अनेक ठिकाणी इंटरनेटसेवा उद्यापर्यंत ( १९ मार्च ) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आज ( १८ मार्च ) सकाळी अमृतपाल सिंह हा त्याच्या सहकाऱ्यांसह शाहकोटजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यासाठी पंजाब पोलिसांच्या ५० गाड्या त्यांच्या मागावर होत्या. अखेर जालंदरच्या नकोदरजवळ सिंह याला साथीदारासह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यानंतर पंजाबमधील परिस्थिती चिघळू नये, यासाठी इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे.
२०२४ च्या निवडणुकीनंतर मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील; अमित शाहांचा विश्वास
भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)२०२४ मध्येही सरकार स्थापन करेल आणि नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सांगितले. इंडिया टुडेने आयोजित केलेल्या ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये ते बोलत होते.मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर जम्मू-काश्मीर, ईशान्य भाग आणि माओवाद्यांच्या समस्या या तीन महत्त्वाच्या बाबींचा मोठ्या प्रमाणात निपटारा करण्यात आला. पाकिस्तानमध्ये भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतरही कोणत्याही परकीय शक्तीने देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याची हिंमत केली नाही, असे गृहमंत्री अमित शाह यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले, “देशाचे पुढचे पंतप्रधान कोण असेल हे जनता ठरवेल. मी देशातील सर्व भागांचा आणि राज्यांचा दौरा केला आहे. त्यावरून मी सांगू शकतो की, पुढील सरकार भाजप बनवेल आणि मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.
सोफीने षटकार ठोकून यूपी वॉरियर्सच्या विजयाचा झेंडा फडकवला, WPL मध्ये मुंबईचा पहिला पराभव
महिला प्रीमियर लीगमध्ये एकाहून एक रंगतदार सामने होत आहेत. आज नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमध्ये या लीगचा १५ सामना खेळवण्यात आला. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स मैदानात आमने-सामने उतरले होते. यूपीन नाणेफेक जिंकून प्रथम फलंजदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर यूपी वॉरियर्सच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करुन मुंबईचा आख्खा संघ १२७ धावांवर गारद केला. त्यामुळे यूपीला विजयासाठी १२८ धावांचं लक्ष्य गाठण्याचं आव्हान होतं.पण यूपीची खराब सुरुवात झाल्यानंतरही ताहिला मेक्ग्राने चौफेर फटकेबाजी केली. ताहिलाने २५ चेंडूत ३८ धावा कुटल्या. पण ताहिला बाद झाल्यानंतर यूपीची अष्टपैलू खेळाडू सोफी एक्लेस्टोनने शेवटच्या षटकात यूपीला ५ धावांची गरज असताना षटकार ठोकला. सोफीने षटकार ठोकून यूपी वॉरियर्सला विजयी सलामी दिली. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा या लीगमध्ये पहिला पराभव झाला.
SD Social Media
9850 60 3590