लोकसभा-विधानसभेला महाराष्ट्रात इतक्या जागा जिंकणार, भाजप अध्यक्षांसमोरच बावनकुळेंचा निर्धार!

भाजपने 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. पहिल्याच दिवशी जेपी नड्डा यांनी चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली. जेपी नड्या यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातच महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत किती जागा जिंकणार, याबाबतचा निर्धार केला आहे.

‘भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी चंद्रपूर आणि औरंगाबाद लोकसभा प्रवास दौरा केला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने युती होईल. 45 लोकसभा आणि 200 विधानसभा जागांवर युती जिंकणार. जनतेला डबल इंजिन सरकारवर विश्वास आहे. भाजप-शिवसेना समन्वयाने जिंकू. जेवढी ताकद भाजपला त्यापेक्षा जास्त ताकद शिवसेनेला देऊ,’ असं बावनकुळे म्हणाले.

युतीमध्ये समन्वयाने कोणती जागा लढवायची ते ठरवणार. लोकसभेत 45 जागा जिंकणार, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी जेपी नड्डा यांच्या औरंगाबादमधल्या सभेत खुर्च्या रिकाम्या होत्या, असा व्हिडिओ ट्वीट केला. अंबादास दानवे यांच्या या टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘खुर्च्या रिकाम्या नव्हत्या. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर काही महिला गेल्या. 4 वाजेपासून लोक आले होते. पूर्ण ग्राऊंड भरलं होतं. 4 ची वेळ होती, पण 8.30 वाजल्याने उशीर झाला. अंबादास दानवेंना माहिती नाही. या युतीचा खासदार दोन लाख मतांपेक्षा जास्त मतांनी निवडून येईल,’ असं बावनकुळे म्हणाले.

‘विरोधकांचं काम टीका करण्याचंच आहे. अंबादास दानवे यांची किंमत काय? तुम्ही दोन हजार लोक जमवू शकत नाही,’ असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दानवेंना लगावला. याशिवाय जेपी नड्डा यांनी त्यांच्या भाषणात बाळासाहेब देवरस यांचा उल्लेख केला, यावरून अंबादास दानवे यांनी बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख धड करू शकत नाही, अशी टीका केली, त्यावरही बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. नड्डांनी दोघांचा उल्लेख केला, बाळासाहेब देवरस आणि बाळासाहेब ठाकरे, तीनदा नाव घेतलं दोन्ही विषय वेगळे आहेत, असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.