युक्रेनमधील भारतीय नागरिकांनी शक्य तिकक्या लवकर आणि उपलब्ध असेल त्या मार्गाने युक्रेनमधून बाहेर पडावे, अशी सूचना किव्हमधील भारतीय दुतावासाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी १९ ऑक्टोबर रोजीही भारतीय दुतावासाडून अशाच प्रकारची सूचना देण्यात आली होती. त्यानंतर अनेक भारतीयांना युक्रेनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे भारतीय दुतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच युक्रेनमधील भारतीय नागरीक हंगरी, सोल्वाकिया, मोल्डोवा, पोलंड आणि रोमानिया सारख्या सीमेवरील देशांच्या मदतीने युक्रेनमधून बाहेर पडू शकता, असेही ही दुतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबरोबरच ज्या युक्रेनधील भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी दुतावासाकडून +३८०९३३५५९९५८, +३८०६३५९१७८८१, + ३८०६७८७४५९४५ तीन हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.