अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येप्रकरणी एक मोठी अपडेट आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपी पोलिसांतील एडिशनल एसपी ओपी पांडे याप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. प्रयागराज पोलीस लवकरच ओपी पांडे यांची चौकशी करु शकते. एडिशनल एसपी ओपी पांडे यांच्यासोबतच इंदु प्रकाश मिश्रा आणि भाजप नेते सुशील मिश्रा यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. सध्या महंत नरेंद्र गिरी आणि त्याचे शिष्य नरेंद्र गिरी यांच्या नात्याबद्दलही चौकशी सुरु आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ओपी पांडे यांनीच मे महिन्यात महंत नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांच्यात मध्यस्थी केली होती. एडिशनल एसपी ओपी पांडे दोन्ही महंतांच्या खूप जवळचे मानले जातात. जेव्हा ओपी पांडे यांनी मध्यस्थी केली होती, तेव्हा ते मुरादाबाद पीएसीमध्ये पोस्टिंगला होता. मध्यस्थी करणाऱ्यांमध्ये समाजवादी पक्षाचे इंदु प्रकाश मिश्रा आणि भाजप नेते सुशील कुमार मिश्रा यांचाहा समावेश आहे. हे दोघेही महंतांच्या खूप जवळचे मानले जातात. इंदु प्रकाश मिश्रा यांना सपा सत्तेत असताना मंत्रीपदी होते. सुशील मिश्रा हे आधी बसपामध्ये होते, 2016 मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले.
एडिशनल एसपी ओपी पांडे यांना पोलीस प्रयागराजला बोलवून चौकशी करु शकतात. तर उद्या सपा आणि भाजप नेत्यांचीही चौकशी होण्याची शक्यात आहे. पोलिसांचा हा प्रयत्न आहे की, या मध्यस्थीनंतरही गुरु-चेले यांच्यात वाद राहिला का आणि त्यातून काही कट शिजला का? असं मानलं जात आहे की, या तिघांच्या चौकशीनंतर काहीतरी पुढं येण्याची शक्यता पोलिसांना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गीरी यांचा मृतदेह बाघंबरी मठातील त्यांच्या खोलीत नायलॉनच्या दोरीला लटकलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांना या प्रकाराची माहिती संध्याकाळी सव्वा पाच वाजता मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह त्यांच्या मठातील खोलीत मिळून आला. मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत होता आणि खोलीचे सर्व दरवाजे बंद होते. खोलीचा मुख्य दरवाजाही आतून बंद होता. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं. त्यानंतर पुरावे गोळा करण्याचं काम सुरु करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.