देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाचे आव्हान पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे हर घर तिरंगा ही मोहीम प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी राबविली जात आहे. याच हर घर तिरंगा मोहिमेच्या निमित्ताने एक बातमी समोर आले आहे. हर घर तिरंगा मोहिमेच्या थीमवर गुजरातमधील एका तरुणाने त्याच्या कारला नवा लूक दिला आहे. त्यासाठी या तरुणाने २ लाखांचा खर्च केला आहे.
सुरत ते दिल्ली दोन दिवस प्रवास –
यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “यावर्षी आझादीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, हर घर तिरंगा आंदोलनाला बळ देऊया. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकावा. याच अभियानाच्या जनजागृतीसाठी गुजरातमधील एका तरुणाने सुरत ते दिल्ली असा सलग दोन दिवस प्रवास केला. सिद्धार्थ असे त्याचे नाव आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.