अभिनेता सोनू सूद याच्या समर्थानात आम आदमी पार्टीने नागपुरात आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. सोनू सूद याच्या घरी आणि कार्यालयावर आयकर विभागाने धाडी टाकत कारवाई सुरू केली आहे. त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं.
आंदोलनकर्ते कार्यकर्ते म्हणाले की, सोनू सूद याने कोरोना काळात चांगलं काम केलं, युवकांसाठी तो काम करत असतो. असं असूनही सोनू सूद हा आम आदमी पक्षाचा मेंटर झाल्यामुळे सूडबुद्धीने त्याच्याविरोधात ही कारवाई केली जात आहे. ही कारवाई बंद केली नाही तर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आप कार्यकर्त्यांनी दिला आहे.
बिहारमध्ये दोन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अचानक 960 कोटी रुपये जमा झाल्याच्या प्रकरणानंतर बराच गदारोळ झाला होता. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील आजमनगरमधील पास्टिया गावातील दोन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये अचानक 960 कोटी रुपये जमा झाले. गुरुचरण विश्वास आणि असित कुमार 15 सप्टेंबर रोजी त्यांच्या इंडसइंड बँक खात्याची तपासणी करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना याची माहिती मिळाली. त्याचवेळी आयकर विभागाने शेकडो किलोमीटर अंतरावरील मुंबईतील अभिनेता सोनू सूदच्या (Sonu Sood) घरावर छापा टाकला होता.
सायबर गुन्ह्याशी संबंधित प्रकरण असल्याचा संशय
दोन्ही विद्यार्थ्यांच्या खात्यात अचानक झालेल्या या व्यवहारामध्ये सायबर क्राईमशी संबंधित प्रकरण असल्याचे, अशी शंका बँक व्यवस्थापक एम के मधुकर यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणी बँकेने स्पष्टीकरणही दिले आहे. आता इंडसइंड बँकेशी संबंधित लोकांचीही चौकशीमध्ये चौकशी केली जात आहे. मात्र, सध्या हे प्रकरण सोनू सूदशी संबंधित असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.
दरम्यान, सोनू सूदची कानपूरच्या रिच ग्रुपशी कनेक्शन मिळण्याची चर्चा ऐरणीवर आली आहे. जिथे असे म्हटले जात आहे की, सोनू सूदवर बनावट कर्ज घेऊन पैसे गुंतवण्याचे प्रकरण समोर आले आहे. आयकर विभागाचे अधिकारी रिच ग्रुपच्या परिसरात सतत छापे घालत आहेत. अशा स्थितीत सोनू सूदशी संबंधित आर्थिक तपास देखील सध्या जोरात सुरू आहे. या छापे दरम्यान, आयकर विभागाला बोगस पावत्या देण्याचे आणि ते विकण्याचे संकेत मिळाले आहेत आणि कंपनीने संचालक म्हणून स्वतःच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचाही पर्दाफाश केला आहे.