शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. आधीच आसाममध्ये पूरपरिस्थिती आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकार अडचणीत आणलं आहे, पण आमचे राज्य नका अडचणीत आणू नका, निघा आता, असा सणसणीत टोला आसामच्या काँग्रेसने लगावला आहे.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३३ आमदार फोडून सुरत व्हाया गुवाहाटी गाठले आहे. मागील पाच दिवसांपासून हे बंडखोरांचे नाट्य सुरू आहे. गुवाहाटीमधील ‘रॅडिसन ब्लू’ हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि सेनेचे आमदार तळ ठोकून आहे. खुद्द आसामधील भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी घेत असल्यामुळे पूर्ण मदत करत असल्याचे समोर आले आहे. भाजपच्या या भूमिकेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून खडेबोल सुनावले आहे.