भाजपचं लोकसभा मिशन , मिशनच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती असणार आहे. युतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील त्यात शून्य जागा जरी आम्हाला लढवावी लागल्या तरी तो मान्य राहील, असं शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
भाजपच्या लोकसभा मिशन बाबत शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.’भाजपाचे मिशन 145 आहे मात्र बाळासाहेबांची शिवसेना व भाजप आमची युती असणार आहेत. यात युतीचे नेत्यांनी जो निर्णय घेतला यात तो आम्हाला मान्य राहील. यामध्ये शून्य जागा जरी लढवायला लागल्या तो आम्हाला मान्य राहील फक्त शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश करावे’ असं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.