कर्नाटक आणि सीमाभागातील प्रसिद्ध असणारे चालता फिरता देव अशी त्यांची प्रसिद्धी असलेले जननयोगाश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे काल (दि.02) सोमवारी निधन झाले. सिद्धेश्वर स्वामी 81 वर्षाचे होते परंतू ते मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. स्वामी ‘वॉकिंग गॉड’ म्हणून त्यांच्या भक्तांमध्ये प्रसिद्ध होते. सिद्धेश्वर स्वामींच्या मृत्यूची घोषणा विजयपुराचे उपायुक्त विजय महांतेश धनम्मानवा यांनी केली. ते म्हणाले की, स्वामींनी सोमवारी आश्रमात अखेरचा श्वास घेतला. तसेच कर्नाटक सरकारच्या अधिसूचनेनुसार, सिद्धेश्वर स्वामींचे अंतिम संस्कार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
कर्नाटक सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आज (दि.03) मंगळवारी सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिद्धेश्वर स्वामी मागच्या 5 वर्षांपूर्वी एका गोष्टीमुळे जोरदार प्रसिद्धीच्या झोतात आले होते त्यांनी पद्मश्री पुरस्कार नाकारला होता. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून माहितीही दिली होती.
सिद्धेश्वर स्वामी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील इतर नेत्यांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामी जी त्यांच्या समाजासाठी केलेल्या अतुलनीय सेवेसाठी स्मरणात राहतील. त्यांनी इतरांच्या भल्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि त्यांच्या विद्वत्तापूर्ण उत्साहासाठीही त्यांचा आदर केला गेला. या दुःखाच्या प्रसंगी माझे विचार त्यांच्यासोबत असल्याचे पीएम मोदी म्हणाले.
स्वामीजींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, ज्ञानयोगाश्रम, विजयपुरा येथील श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. त्यांनी आपल्या प्रवचनातून मानवजातीच्या उद्धारासाठी मोठा प्रयत्न केला आहे. त्यांची सेवा अद्वितीय आहे. स्वामीजींचे जाणे ही कधीही भरून न येणारी हानी आहे असे बोम्मई म्हणाले.
त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो. देशभरातील त्यांच्या भक्तांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देव देवो. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री कुमार स्वामी आणि इतर नेत्यांनीही ट्विट करून सिद्धेश्वर स्वामी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.