राजस्थानमधील बाडमेरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील भीमडाजवळील वायु सेनेचे लढाऊ विमान मिग क्रॅश झाल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रॅशनंतर विमानाचा ढिगारा एक किलोमीटरपर्यंत पसरला आहे. ही घटना गुरुवारी रात्री 9 वाजता घडली.
या घटनेत दोन्ही पायलटांचा मृत्यू झाला. त्यांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत. फायटर प्लेन मिग क्रॅश झाल्यानंतर ढिगाऱ्याला आग लागली. सूचना मिळताच घटनास्थळी प्रशासनाची टीम रवाना झाली.
मिग क्रॅश झाल्याच्या साधारण 1 किमीच्या अंतरावर विमानाचे पार्ट पसरले आहेत. ही घटना बायतू पोलीस ठाणे हद्दीतील भीमडा गावात घडली आहे.