गेल्यावर्षी गलवानमध्ये भारताकडून पराभव स्वीकारल्यानंतर चीन (China) आता सरळ भिडण्यापासून घाबरत आहे. चीनने भारतासोबत लढण्यासाठी आता तिबेटियांना ला हत्यार बनवण्याचा प्रयत्न केलाय. चीनने आता तिबेटीयन (Tibetan) लोकांना भारताशी युद्ध करण्यासाठी सशस्त्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक घरातून एका व्यक्तीला PLA मध्ये पाठवलं
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, चीने तिबेटमध्या राहणाऱ्या सगळ्या कुटुंबियांना आदेश देण्यात आलेत की, प्रत्येक घरातून एक व्यक्ती पीपुल्स लिबरेशन आर्मी (PLA) असणं गरजेचं आहे. या तिबेटियन्सना मिलिट्री ट्रेनिंग दिल्यानंतर लडाख, उत्तराखंड आणि अरूणाचल प्रदेशमध्ये तिबेट बॉर्डरवर तैनात करण्यात येणार.
रिपोर्टनुसार, सेनेत भर्ती होण्यासाठी पहिल्यांदा तिबेटियनला अनेक लेवलवर लॉयलटी टेस्ट करावी लागणार आहे. याकरता तिबेटियन्सला चीनची मंडारिन भाषा सिखण्याची गरज आहे. तिबेटियनला पूर्णपणे स्वतःला चीनचा एक भाग समजायला हवं. त्याच वेळी, चिनी कम्युनिस्ट पार्टीला (CCP) त्याच्या सर्व विश्वासांपेक्षा सर्वोच्च मानावे लागेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने अनेक कारणे लक्षात घेऊन तिबेटीयन (PLA) समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी पहिले कारण म्हणजे हिमालयातील अत्यंत थंड आणि कठोर हवामान. जे पीएलए सैनिक सहन करू शकत नाहीत. तर तिबेटी, या भागातील रहिवासी असल्याने या हवामानाची सवय आहे आणि ते सहजपणे कुठेही चढतात.
दुसरे कारण म्हणजे चीनवरील वाढते आंतरराष्ट्रीय दबाव कमी करणे. तिबेटींना त्यांच्या सैन्यात समाविष्ट करून भारताविरूद्ध विशेष ऑपरेशन करण्याची योजना आहे. जर या योजनेत तिबेटी सैनिक मारले गेले, तर चीन सहजपणे जगाला सांगू शकेल की तिबेटी लोक त्यांच्या जन्मभूमी चीनला वाचवण्यासाठी शहीद झाले आहेत.
भारताच्या विकास बटालियनकडून कमाल कामगिरी
अहवालानुसार, आतापर्यंत तिबेटींना द्वितीय श्रेणीचे नागरिक मानणाऱ्या चीनचे मन अचानक बदललेले नाही. मागच्या वर्षी 29-30 ऑगस्ट रोजी भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्स अर्थात विकास बटालियनने केलेली कारवाई या मागे होती. ज्या अंतर्गत तिबेटी युवकांनी बनवलेल्या या गुप्त शक्तीने एका रात्रीत एक ऑपरेशन चालवून पॅनगॉन्ग तलावाच्या दक्षिणेकडील सर्व उंच शिखरे काबीज केली.
भारताच्या आश्चर्यकारक कारवाईने हैराण झालेले चीन काही करू शकले नाही. चीनने नंतर ही शिखरे काबीज करण्याचे अनेक प्रयत्न केले पण तिबेटी सैनिकांच्या शौर्यामुळे त्याचे सैनिक पुढे जाण्याचे धाडस करू शकले नाहीत. यानंतर त्याला पॅनगॉन्ग लेकच्या फिंगर परिसरात माघार घेण्याचे मान्य करावे लागले.
लडाखमधील या मोठ्या पराभवानंतर चीनने या वर्षी फेब्रुवारीपासून तिबेटींना आपल्या सैन्यात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली. असेही समजले आहे की, या पैजातून चीन तिबेटवर आपली पकड मजबूत करू इच्छितो तसेच तिबेटी लोकांच्या मनापासून दलाई लामांचा प्रभाव मिटवू इच्छितो.
भारतीय लष्कराच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, त्यांना चीनच्या या षडयंत्राची माहिती आहे. तिबेटींना त्यांच्या सैन्यात भरती करून ते भारताची नक्कल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते फारसे यशस्वी होणार नाहीत. याचे कारण असे आहे की तिबेटी लोकांना चांगले माहित आहे की चिनी लोक त्यांच्या देशावर कब्जा करणारस आक्रमक आहेत. जगभरातील लाखो लोक ते मुक्त करण्यासाठी लढत आहेत. (फोटो क्रेडिट गुगल)