फेसबुक (Facebook) हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. कंपनी लक्ष केंद्रित करत आहे की, हे प्लॅटफॉर्म यूजर्सला अधिक उपयोगी कसे पडेल आणि समजण्यास कसे सोपे होईल यावर भर देत आहे. भारतातील यूजर्ससाठी Facebookच्या नवीन पुनर्रचनेमध्ये, अॅप वापरण्यासाठी अधिक अनुकूल बनवण्यासाठी एक पाऊल उचलले गेले आहे.
दरम्यान, फेसबुक पेजने देशातील यूजर्ससाठी लाइक ( Like) बटण काढून टाकले आहे आणि एका पृष्ठाच्या फॉलोअर्सवर लक्ष केंद्रित केले आहे. फेसबुक पेजेसची नवीन रचना यावर्षी जानेवारीमध्ये सादर करण्यात आली होती आणि आता ती भारतात आणली जात आहे.
फेसबुक पेजेसच्या नवीन डिझाईन आणि यूजर्स इंटरफेसच्या अनुषंगाने, लेआउट सोपे आणि अधिक सहज बनवण्यात आले आहे. एक समर्पित न्यूज फीड सेक्शनसह जे यूजर्सना संभाषणांमध्ये सामील होण्यास, ट्रेंड फॉलो करण्यास, साथीदार आणि चाहत्यांशी संवाद साधण्यास अनुमती देईल.
फेसबुकने (Facebook) आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “यामुळे ट्रेंड फॉलो करणे, साथिदारांशी संवाद साधणे आणि चाहत्यांशी संवाद साधणे सोपे होईल. सर्वांसाठी याचा वापर करणे अधिक सोपे जाईल, असा प्रयत्न करण्यात येत आहे. पेज, ग्रुप्स आणि ट्रेंडींग कन्टेंट अशा नवीन कनेक्शनेचे पर्याय मिळणार आहे.
फेसबुक पेजेसचे नवीन डिझाईन सुधारित सुरक्षिततेसह येत आहे. जे भडकावू भाषण, हिंसा, लैंगिक किंवा स्पॅमयुक्त सामग्री आणि तोतयागिरीसारख्या प्रतिबंधित क्रियाकलाप शोधण्यात सक्षम असेल. माहितीची सत्यता (authenticity of the information) राखण्यासाठी एकाच पानावर व्हेरिफाइड अर्थात योग्य पडताळणीची दृश्यमानता देखील वाढवण्यात आली आहे.
यूपीएससी संबंधी विशेष माहिती येथे पहा :