आज दि.१३ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी
दहा हजार कोटींचे अर्थसहाय्य

अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करण्याची घोषणा राज्य मंत्रिमंडळाने केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला.
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाल्याचं अंदाज आहे.

20 ऑक्टोबरपासून
राज्यातील कॉलेज सुरु होणार

देशासह राज्यात कोरोनाच प्रादुर्भाव कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 8 वी ते 10 वी चे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. त्यानंतर कॉलेज कधी सुरु होणार याबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 20 ऑक्टोबरपासून राज्यातील कॉलेज सुरु होणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे.

अजीर्ण होईल इतका पाहुणचार
घेऊ नये : शरद पवार

गेल्या सहा दिवसांपासून पवार कुटुंबीयांपैकी काहींच्या घरी आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी देखील सलग ५ ते ६ दिवस छापे टाकण्यात आले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. “पाहुण्यांनी पाहुणचार घ्यावा, पण अजीर्ण व्हावं, इतका पाहुणचार घेऊ नये”, असं पवार म्हणाले आहेत. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

धक्कादायक! पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या; गळफास घेत संपवलं जीवन

भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याने पुण्यातील वानवडी परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. त्या पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणासाठी आल्या होत्या. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

रश्मी आशुतोष मिश्रा असं आत्महत्या करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचं नाव असून त्या देहरादून येथील रहिवासी आहेत. त्या पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी आल्या होत्या. मृत रश्मी मिश्रा या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असून सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पुण्यात आल्या होत्या

आर्यन खान च्या अडचणीत वाढ; शाहरुखचा मुलगा कुठून ड्रग्स घ्यायचा NCB ने केला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय घेण्याचे अधिकारक्षेत्र नसल्याचे कारण देत त्यांची याचिका फेटाळल्यानंतर हे प्रकरण विशेष न्यायालयात झाले होते. त्यांनतर यावर आज १३ ऑक्टोबर दिवशी सुनावणी सुरु आहे.

दरम्यान आज NCB ने खुलासा करत सांगितलं आहे, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा आपला मित्र आणि या प्रकरणातील आणखी एक आरोपी असणारा अरबाजकडून कॉन्ट्राबँड खरेदी करत असे. तसेच आर्यन खान औषधांच्या बेकायदेशीर खरेदीसाठी ‘आंतरराष्ट्रीय औषध नेटवर्क’चा भाग असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात असल्याचा दावा NCB ने केला आहे.तसेच आरोपी क्रमांक १७ अचित कुमार आणि क्रमांक १९ शिवराज हरिजन आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाजला ड्रग्स पुरवत असल्याचंही NCB ने म्हटलं आहे. आर्यन खान आणि अरबाज हे नेहमीच एकमेकांसोबत असत त्यामुळे दोघांचाही यात हात असणार म्हणत दोघेही NDPS च्या कलम २९ लागू करण्यास पात्र असल्याचं म्हटलं आहे.

भाजपमध्ये आल्याने चौकशीची
भीती नाही : हर्षवर्धन पाटील

एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी आपण भाजपामध्ये आल्यानंतर काय बदल घडला, याविषयी मिश्किल टिप्पणी केली आहे. “इथे आमदार साहेब मला म्हणाले, मी आहे तिथे सुखी आहे, तम्ही दिल्या घरी सुखी राहा. मला विचारणा झाली की तुम्ही भाजपामध्ये का गेलात? मी त्यांना म्हटलं, तुमच्या नेत्यालाच विचारा की हर्षवर्धन भाजपामध्ये का गेले. पण मी सांगतो, इथे मस्त निवांत आहे. भाजपामध्ये आल्यामुळे शांत झोप लागते. चौकशी नाही, काही नाही. मस्त वाटतंय”, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.

जगातील सर्वात मोठ्या १० कर्जदार
देशामध्ये पाकिस्तानचा समावेश

इतर देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेऊन आपली अर्थव्यवस्था चालवणाऱ्या पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. जागतिक बँकेने जारी केलेल्या अहवालानुसार, करोना महामारीने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे आणि आता पाकिस्तान जगातील सर्वात मोठ्या १० कर्जदार देशांपैकी एक बनला आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तान आता डेट सर्व्हिस सस्पेंशन इनिशिएटिव्ह (DSSI) च्या कक्षेत आले आहेत, त्यामुळे त्यांना परदेशी कर्ज मिळवणे देखील कठीण झाले आहे.

घरगुती सिलेंडर साठी श्रीलंकेत
मोजावे लागतात 2,657 रुपये

श्रीलंकेत मानक घरगुती एलपीजी सिलिंडरची (12.5 किलो) किंमत 1,400 रुपये होती. पण, आता त्यात 1,257 रुपयांनी वाढून तो 2,657 रुपये झाला आहे. याशिवाय एक किलो दूध आता 250 ते 1,195 रुपयांनी महाग झाले आहे. त्याचप्रमाणे गव्हाचे पीठ, साखर आणि सिमेंट यासारख्या आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
एलपीजीच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्याने येथील लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात
बॉम्बशोधक पथक दाखल

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात बॉम्ब असल्याची माहिती बुधवारी दुपारी (१३ ऑक्टोबर २०२१ रोजी) प्रशासनास मिळाली. यानंतर तात्काळ संपूर्ण मंदिर परिसराचा ताबा पोलिसांनी घेतला. मंदिर परिसरातील सर्व दुकाने तातडीने बंद करुन तपास करण्यात आला. या सर्व घडामोडींमुळे मंदिर परीसरामध्ये सर्वत्र निरव शांतता आणि घबराट पसरली गेली. बुधवारी दुपारी अचानक पोलिसांच्या गाड्यांचा ताफा मंदिर परिसरात आला. सर्व दुकाने तात्काळ बंद करून घेतली.

एसटीतील कर्मचाऱ्यांना सप्टेंबर
महिन्यातील पगार लवकरच देण्यात येणार

ऐन दसऱ्याच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटला आहे. एसटी महामंडळाला मानव विकास योजनेतील 231 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. एसटीतील 93 हजार कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यातील पगार लवकरच देण्यात येणार आहे. एसटी कामगारांचा दसरा गोड होणार आहे.

मंदाकिनी खडसे यांचा
जामीन अर्ज फेटाळला

पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. याच प्रकरणात एकनाथ खडसेही आज सत्र न्यायालयात जाऊ शकले नाहीत. खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते सध्या बॉम्बे रुग्णालयात दाखल आहेत.

व्हाट्सअप वापरणाऱ्या मुस्लिम
महिलांना चीनमध्ये घेतले ताब्यात

चीनमध्ये मुस्लिमांवरील (Muslims in China) होणाऱ्या अत्याचाराबाबत एक नवा खुलासा समोर आला आहे. एका पुस्तकात असे म्हटले आहे की, चीनचे कम्युनिस्ट सरकार मुस्लिम महिलांना (Muslim Women) व्हॉट्सअॕप (WhatsApp) वापरल्याबद्दल ताब्यात घेत आहेत. सरकार द्वारा या महिलांना प्री-क्रिमिनल्स म्हटलं जातं. यापूर्वीही चीनची मुस्लिमविरोधी विचारधारा अनेक वेळा उघड झाली आहे. चीनमध्ये उईगर मुसलमान नागरिकांना मोठ्या प्रमामात अत्याचारांचा सामना करावा लागतो.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.