जळगाव वकील आणि जळगाव जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष अॕड.नारायण रामदयाल लाठी यांना महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेतर्फे विशेष सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. माहेश्वरी समाजात विशिष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार देण्यात येतो.
हा सोहळा दिनांक १७ आणि १८ सप्टेंबर रोजी इचलकरंजी येथे महाराष्ट्र प्रदेश सभेची तृतीय समितीचे बैठकित प्रदान करण्यात येईल.
याबरोबरच कौशिक बंग विशेष कार्य उपलब्ध बद्दल देवेश भैया, महेश शिक्षा रत्न संगीता जी बियाणी विशेष कार्य उपलब्ध बद्दल सुधाजी काबरा विशेष सन्मान आदींना प्रदान करण्यात येणार आहे.