आज दि.२ जानेवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

क्रिकेटपटूंच्या विश्रांतीवरून BCCI अन् IPL फ्रँचाइजींमध्ये वादाची ठिणगी?

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड प्रक्रियेत फक्त आयपीएलमधील कामगिरीचा विचार केला जाणार नाही असं बीसीसीआयने रविवारी स्पष्ट केलं आहे. बीसीसीआयची रविवारी आढावा बैठक झाली. यावेळी खेळाडूंचा वर्कलोड, त्यांचा फिटनेस आणि टेस्ट यावरही चर्चा झाली. बीसीसीआयने आयपीएल फ्रँचाइजींना स्पष्ट बजावलं आहे की, खेळाडूंच्या वर्कलोडचे व्यवस्थापन करावं. नॅशनल क्रिकेट अकादमीला बोर्डाने आदेश दिला की या प्रकरणी फ्रँचाइजींसोबत काम करावं आणि लक्षही ठेवावं.

दरम्यान, बीसीसीआयच्या या निर्णयानंतर आता आय़पीएल फ्रँचाइजीसोबत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आयपीएल 2023 चे काउंटडाऊन सुरू झाले आहे. नुकताच आयपीएलचा मिनी लिलाव पार पडला. यामध्ये विक्रमी किंमत मोजून फ्रँचाइजींनी खेळाडूंना संघात घेतलं आहे. तर दुसरीकडे खेळाडूंवर असलेला ताण कमी करण्यासाठी आयपीएल संघांसोबत एनसीए काम करेल असं बीसीसीआय़ने म्हटलं आहे. वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

‘अजित पवारांचे विधान म्हणजे..’ छत्रपती शंभूराजेंवरुन सुरू असलेल्या वादात मराठा सेवा संघाची उडी

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाही तर स्वराज्यरक्षक आहे, असं वक्तव्य केलं होतं. यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात दोनतीन जिल्ह्यांत आंदोलने देखील करण्यात आली. पवारांच्या वक्तव्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी देखील आक्षेप घेतला होता. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्याचं संरक्षण छत्रपती संभाजी महाराज यांनी केलं. त्यामुळे संभाजीराजे धर्मरक्षकही असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. दरम्यान, या वादात आता मराठा सेवा संघाने उडी घेतली आहे. अजित पवार यांच्या विधानाचे संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी समर्थन केलं आहे.

भाजपचं ‘मिशन महाराष्ट्र’ देवेंद्र फडणवीसांशिवाय सुरू

भाजपच्या मिशन महाराष्ट्रला चंद्रपूरमधून सुरूवात झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपने 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुकलं आहे. भाजपने महाराष्ट्रासाठी मिशन 144 ची घोषणा केली आहे, पण भाजपचं हे मिशन देवेंद्र फडणवीस यांच्याशिवायच सुरू झालं आहे. उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस चंद्रपूर दौऱ्यावर जाणार होते , पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे फडणवीसांचा हा दौरा रद्द झाला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. रात्री 1 वाजता देवेंद्र फडणवीस यांची तब्येत बिघडली, त्यांचा ताप 103 पर्यंत गेला आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

जम्मूमध्ये दहशतवाद्यांकडून हिंदूंचं टारगेट किलिंग; गोळीबारात 4 ठार

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सतत सुरुच आहेत. पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेला न जुमानता ‘टारगेट किलिंग’ केलं जातंय. हिंदू धर्माच्या व्यक्तींना पाहून छळणं, ठार करणं अशा पद्धतीच्या दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे नागरिक त्रस्त झालेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जम्मूमध्ये पुन्हा एक दहशतवादी कृत्य घडलं. राजौरी जिल्ह्यातल्या एका गावात दहशतवाद्यांनी हिंदूंना टारगेट करून गोळीबार केला. त्यात 4 जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. त्या संदर्भात पोलिसांनी नाकाबंदी करून शोधमोहीम सुरु केली आहे.राजौरी जिल्ह्यातल्या डांगरी गावातल्या सरपंच धीरज शर्मा यांनी घटनेची माहिती दिलीय. दहशतवाद्यांनी मारण्याच्या आधी ओळखपत्र पाहिल्याचं त्यांनी सांगितलं. ओळखपत्रावरून हिंदू असलेलं पाहून त्यांनी 4 जणांना मारलं, असं त्यांनी सांगितलं. ऑनलाईन मीडिया रिपोर्ट्सही तसंच सांगताहेत.

नोटबंदीचा निर्णय योग्यच, सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या 58 याचिका

नोटबंदी संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. बहुप्रतिक्षीत असलेल्या नोटबंदीच्या याचिकेवर सुप्रिम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. नोटबंदी निर्णयाविरोधातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या आहेत. केंद्र सरकारचा निर्णय़ घटनाबाह्य़ नसल्याचा निर्णय घटनापीठाने दिलं आहे,

न्यायमूर्ती भूषण गवई यांनी या निकालाचं वाचन केलं. नोटबंदी सरसकट अयोग्य ठरवली जाऊ शकत नाही. केंद्र आणि आरबीआयमध्ये 6 महिने चर्चा केल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे.

2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा केंद्राचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कायम ठेवला. मोदी सरकारच्या नोटाबंदीला आव्हान देणाऱ्या 58 याचिकांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने आर्थिक निर्णय बदलता येणार नाहीत, असं म्हटलं.

टाटा ग्रूपला ‘ग्लोबल टी’चा दर्जा मिळवून देणाऱ्या या जवळच्या व्यक्तीलाच गमवलं, रतन टाटा झाले भावुक

टाटा उद्योग समूहानं उद्योगपती रतन टाटांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. या वाटचालीमध्ये अनेक सहकाऱ्यांनी रतन टाटांना मदत केली आहे. मात्र, यातील एका सहकाऱ्यानं टाटांची साथ सोडली आहे.

रतन टाटा यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे टाटा सन्सचे माजी संचालक आर. के. कृष्णकुमार यांचं निधन झालं आहे. ते 84 वर्षांचे होते. टाटा चहाला जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचवण्याचं श्रेय कृष्णकुमार यांनाच जातं. कृष्णकुमार सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्तही होते.

तेजस्वी यादवांच्या घरात हलणार पाळणा; मार्च महिन्यात होणार नव्या पाहुण्याचं आगमन

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या आजारपणामुळे आणि शस्त्रक्रियेमुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून तणावाचा सामना करत होतं. मात्र, प्रदीर्घ काळानंतर आता कुटुंबाला आनंदाची बातमी मिळणार असल्याची चर्चा आहे. लालू यादव यांचा धाकटा मुलगा तेजस्वी यांच्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बिहारचे उपमुख्यमंत्री असलेले तेजस्वी यादव लवकरच वडील होणार आहेत. त्यांची पत्नी राजश्री आई होणार असून त्या दिल्लीत डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचं म्हटलं जात आहे. मार्चमध्ये लालू यादव आणि राबडी देवी यांच्या कुटुंबात नवीन सदस्य येण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ‘नवभारत टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

एलॉन मस्कपेक्षा जास्त श्रीमंत होण्यासाठी गौतम अदाणींसाठी काही आठवड्यांचीच प्रतीक्षा

अब्जाधीश गौतम अदाणी १२१ अब्ज डॉलर्स संपत्ती असलेले जगातले तिसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. एलॉन मस्क यांना संपत्तीच्या बाबतीत मागे टाकण्यासाठी अब्जाधीश गौतम अदाणी हे काही आठवडे दूर आहेत. एलॉन मस्क यांना ते काही आठवड्यातच संपत्तीच्या बाबतीत मागे टाकू शकतात. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची संपत्ती नोव्हेंबर २०२१ मध्ये ३४० अब्ज डॉलर्सवरून १३७ अब्ज डॉलर्सवर घरसली आहे. दुसरीकडे ब्लुम्बर्गद्वारे आशियातील सर्वात बिझी डीलमेकर म्हणून जे उद्योजक आहेत ते गौतम अदाणीच आहेत. गौतम अदाणी यांच्या संपत्तीत एक वर्षात मोठी भर पडली आहे. त्यामुळे त्यांची संपत्ती १२१ अब्ज डॉलर्सवर गेली आहे.गेल्या एका वर्षात गौतम अदानी यांची संपत्ती ४४ अब्ज डॉलर्सने वाढली, तर मस्कची संपत्ती १३३ अब्ज डॉलर्सने घसरली. एलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीत घट होत राहिली आणि गौतम अदानी यांनी गेल्या १२ महिन्यांच्या गतीने त्यांच्या संपत्तीत अब्जावधींची भर घातली. हे प्रमाण असंच राहिलं तर तर भारतीय टायकून ट्विटर बॉसला पाच आठवडे किंवा ३५ दिवसांत मागे टाकतील. जगातले दुसरे श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी. जर मस्क यांची संपत्ती दररोज सरासरी ०.३६ अब्जां डॉलर्सनी घसरत राहिली आणि अदाणी यांची संपत्ती गेल्या बारा महिन्यातील वेगाप्रमाणेच रोज सरासरी ०.१२ अब्ज डॉलर्सनी वाढत राहिली तरीही येत्या ३५ दिवसात गौतम अदाणी हे एलॉन मस्क यांना मागे टाकतील.

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थान परिसरात आढळला बॉम्ब

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या चंदिगड येथील निवासस्थान परिसरात बॉम्बशेल आढळला आहे. या घटनेची माहिती होताच पोलीस तसेच बॉम्बशोधक पथक या परिसरात दाखल झाले आहे. पोलिसांनी बॉम्बशेल आढळलेला परिसर सील केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी बॉम्बशेल आढळला आहे, तेथून पंजाब आणि हरियाणा अशा दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याचे निवासस्थान जवळच आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली ‘मिशन २०२४’! भारतीय टी२० संघाने ‘बिग थ्री’ ना स्पष्ट संकेत

भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षातील त्यांच्या अभियानाची सुरुवात करण्यासाठी तयार आहे. संघाला श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी२० आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका खेळायची आहे. उभय संघांतील टी२० मालिका ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा टी२० मालिकेत खेळणार नसल्यामुळे हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करताना दिसेल.भारतीय संघ २०२३ ची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेने करणार आहे. ३ जानेवारीपासून दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाचे कर्णधारपद मिळाले आहे. ‘मिशन २०२४’ साठी टीम तयार करण्याची जबाबदारी त्याच्याकडे आहे. पुढील वर्षी वेस्ट इंडिज-अमेरिकेत टी२० विश्वचषक होणार आहे. त्या स्पर्धेत हार्दिक टीम इंडियाचे नेतृत्व करेल अशी दाट शक्यता आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.