कोणाचं नशीब कधी आणि कसं बदलेल हे आपण सांगू शकत नाही. असे अनेक लोक आहेत. ज्यांना मेहनत करुन देखील फळ मिळत नाही. तर तुम्हाला असे देखील लोक पाहायला मिळतील की, ज्यांना एकच प्रयत्नात असं काही यश मिळतं की, त्यांचं आयुष्यच संपूर्ण बदलं. असंच काही छत्तीसगडमधील एका आदिवासी मुलीसोबत घडलं.
या १६ वर्षीय आदिवासी मुलीची नासाच्या प्रकल्पासाठी निवड झाली आहे. छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणाऱ्या रितिका ध्रुवची नासाच्या प्रकल्पासाठी निवड झाली आहे.
रितिकाच्या या प्रोजेक्टचा विषयच असा होता की मोठे शास्त्रज्ञ थक्क झाले. रितिकाने ‘अंतराळात पोकळी आहे, तरी देखील नासाला या ब्लॅक होलमध्ये आवाज कसा सापडला?’ आदिवासी समाजातून आलेल्या या मुलीच्या कामगिरीने प्रभावित होऊन तिची नासाच्या प्रकल्पासाठी निवड झाली आहे. यामुळे रितिकाचे स्वप्न देखील पूर्ण झाले आहे.
रितिका ही ११वीची विद्यार्थिनी आहे. ती रायपूरपासून ६० किमी अंतरावर असलेल्या आत्मानंद सरकारी इंग्रजी शाळेत शिकते. रितिकाला लहानपणापासूनच अवकाशाशी संबंधित विषयांची आवड होती. नासामध्ये जाणे म्हणजे त्याच्यासाठी तिचे स्वप्न पूर्ण करण्यासारखे आहे.
रितिकाच्या मुख्याध्यापकांनी एका मुलाखतीत सांगितले की, ”रितिकाच्या टीमने चांगली कामगिरी केली. रितिका सध्या सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये 1 ते 6 ऑक्टोबर दरम्यान गुरुत्वाकर्षण शक्तीचे प्रशिक्षण घेत आहे.”
रितिकाच्या प्राचार्याने सांगितले की ती अभ्यासात खूप वेगवान आहे. ऑनलाइन प्रश्नमंजुषामध्येही ती बऱ्याचदा भाग घेते. मुख्याध्यापकांनी सांगितले की, रितिका अतिशय साध्या कुटुंबातून येते. त्याच्या वडिलांचे सायकल दुरुस्तीचे दुकान आहे.
घरीची परिस्थिती हालाकिची असताना देखील रितिकाच्या जिद्द आणि चिकाटीने तिला इथपर्यंत पोहोचवले आहे. जे खरोखरंच कौतुकास्पद आहे.