राज्यातील वीज टंचाईबाबत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. मंत्रिमंडळातील काही मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहे. या बैठकीत राज्यातील वीजप्रश्नावर काय चर्चा होते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. कोळसा कमी उपलब्ध असल्यानं राज्यावर वीज संकट ओढावू शकतं अशी भीती व्यक्त केली जाते आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते आहे.
अवघे काही दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वीजप्रश्नाबाबत होणाऱ्या या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचंय. कोळशाच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रावर वीजसंकटाचे ढग घोंगावत आहेत. वाढलेल्या तापमानात आता महाराष्ट्रात वीज संकटामुळे पुन्हा लोडशेडिंगला सामोरं जावं लागणार काही काय? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जातोय.
कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्यात लोड शेडिंगसारखी स्थिती ओढावू शकते, अशी भीती निर्माण व्यक्त केली जाते आहे. राज्यात अवघे दोन ते तीन पुरेल इतका कोळशाचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे कोयाना धरणातील पाणीसाठा 17 ते 18 दिवस पुरेल इतकाच वीजनिर्मितीसाठी उपलब्ध आहे, असंही सांगितलं जातंय.
कोळशाच्या तुटवड्यामुळे आता राज्य सरकार खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी करण्याची शक्यता असल्याचंही बोललं जातंय. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे.
महाराष्ट्रात दररोज 20 ते 22 हजार मेगावॅट इतक्या विजेची गरज भासते. अशातच आता राज्याची वीज मागणीत वाढ झाली आहे. राज्याच्या विजेची मागणी आता 28 हजार मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. दोन ते तीन दिवसांत हीच मागणी 30 हजार मेगावॅटपर्यंत जाईल, अशी शक्यता वर्तवली जातेय.