ईडी हा राक्षसी कायदा, बदलण्याची गरज : मंत्री छगन भुजबळ

ईडी हा राक्षसी कायदा आहे. तो बदलण्याची गरज असल्याचे मत राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ते अकोल्यात एका विवाह सोहळ्यासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते. छगन भुजबळ म्हणाले, भाजपच्या नेत्यांनी सांगितल्याशिवाय ईडीची धाड पडत नाही. भाजप वाल्यानी सांगितलं की, हा भाजपमध्ये आलाय. तर ईडीची कारवाई नाही.

मात्र भाजपच्या विरोधात बोलतोय. तेव्हाच मात्र ईडीची धाड पाडली जाते. म्हणजे भाजप सांगेल त्याप्रमाणे ईडी कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर ईडी या कायद्यात जामीन मिळत नाही. हा राक्षसी कायदा आहे. हा सर्वांनी म्हणजेच विरोधकांनीही एकत्र येत रद्द करण्याची, मागे घेण्याची गरज असल्याचे मतही भुजबळ यांनी व्यक्त केले.

आज अकोल्यात माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या मुलीच्या लग्न समारंभात छगन भुजबळ हे आले होते. मला वाटते ईडी म्हणजे राक्षसी कायदा आहे. ते लवकरात लवकर बंद केलं पाहिजे, असे वक्तव्य पत्रकारांशी बोलताना केलं. ईडीच्या कायद्यानं बरेच जण अडचणीत येतात. सूडबुद्धीनं याचा वापर केला जातो. त्यामुळं हा कायदा रद्द करण्याची गरज आहे, असंही भुजबळ म्हणाले.

केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळं भाजपला वाटेल तेव्हा ते ईडीचा वापर करून घेतात. त्यामुळं गुन्हे नसतानाही विनाकारण त्रास दिला जातो. केंद्र सरकार किंवा भाजपच्या विरोधात कुणी गेला की, लगेच ईडी मागे लागते. यात संबंधितांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळं ईडीसारखा कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावं, असं भुजबळ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.