ऑरेंज कॅपमध्ये डिकॉकची आगेकुच, पर्पलच्या यादीत उमेश ‘राज’ कायम

IPLच्या पंधराव्या सीजनमध्ये गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना झाला. लखनौ सुपर जायंट्सने विजयाची हॅट्ट्रिक केली. चेन्नई सुपर किंग्स , सनरायजर्स हैदराबादनंतर लखनौ सुपर जायंट्सने गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सला हरवलं. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आयुष्य बदोनीने षटकार ठोकून लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शार्दुल ठाकूर अखेरच षटक टाकत होता.

सामना रंगतदार स्थितीत असताना आयुषने चौकार-षटकार ठोकून लखनौला तिसरा विजय मिळवून दिला. 6 विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. दिल्लीने विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य दिले होते. लखनौने चार बाद 155 धावा केल्या. या विजयामुळे लखनौचा आत्मविश्वास उंचावला आहे. दिल्लीच्या संघातून गुरुवारी एनरिच नॉर्खिया आणि डेविड वॉर्नर हे मोठे खेळाडू खेळले. दरम्यान, आयपीएलच्या या गुरुवारी झालेल्या सामन्यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या यादीत पुन्हा एकदा बदल झालाय.

राजस्थान रॉयल्सचा ओपनर जोस बटलर धावांच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. बटलरने आपयपीएलच्या या सीजनमध्ये 200 पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. त्यानंतर क्विंटन डिकॉकच्या 149 धावा झाल्या असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने अर्धशतक पूर्ण केलं आहे. डिकॉकने मुंबई इंडियन्सचा ओपनर इशान किशनला मागे पाडलं आहे. इशानने देखील 149 धावा काढल्या आहेत.

मात्र, क्विंटनचा रन रेट इशानपेक्षा अधिक आहे. तिसऱ्या क्रमांकावर इशान किशन आहे. चौथ्या क्रमांकावर केएल राहुल असून त्याने 132 धावा केल्या आहेत. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर दीपक होडा आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 130 धावा केल्या आहेत.

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.