सातारा: महाराणी येसूबाईंच्या समाधी साताऱ्यातील माहुली येथे सापडली

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांच्या साताऱ्यातील माहुली येथील समाधी सापडली आहे. येथील हरिनारायण मठाच्या इसवी सन १७५६ मधील ऐतिहासिक कागदपत्रावरून हा शोध लागला आहे. सखोल संशोधनातन यासंदर्भात मूळ दस्तऐवज गुरुवारी साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उघड करण्यात आले यामुळे समाधीचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला गती मिळणार आहे.

येसूबाई फाउंडेशन चे संस्थापक सुहास राजेशिर्के आणि जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेचे निलेश पंडित यांच्या उपस्थितीत ही माहिती देण्यात आली .यासंदर्भात बोलताना निलेश पंडित म्हणाले, संगम माहुली गावात एक मोठा दगडी चौथरा आहे या चौथ्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नीचा सगुणाबाई यांचे वृंदावन आणि त्याच्या पाठीमागे सगुणेश्वराचे देवालय आहे . सगुणाबाईंचा मृत्यू २५ जुलै १७४८ रोजी झाला. या समाधीच्या पुढील बाजूस कृष्णा वेण्णामाईची रथ शाळा आहे .या रथ शाळेला लागूनच पूर्वाभिमुख अवाढव्य एक दगडी बांधकाम दिसते. हे दगडी बांधकाम म्हणजेच स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांचे समाधी स्थळ आहे . ही समाधी स्थळ वीस फूट उंच आणि दहा फूट रुंद आहे. या इमारतीवर राजघराण्याशी संबंधित अशी राजचिन्हे कोरण्यात आली आहेत .या समाधीचा शोध ज्या इनामपत्राच्या आधारावर घेतला . येथील हरिनारायण मठाच्या दस्तऐवजामध्ये ही माहिती मिळून आली.

ताराराणी यांनी हरिनारायण मठाच्या देवालयाच्या जीर्णोध्दारासाठी मदत करण्याकरिता जो पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहारातून महाराणी येसूबाईंच्या समाधीचा स्पष्ट उल्लेख असल्याचे सांगण्यात आले . या देवालयाच्या उभारणीसाठी ताराराणी यांनी एक बिघा जमीन देऊ केली होती . या जमिनीच्या चतु :सीमा निश्चित करताना येसूबाईंची घुमटी म्हणजे समाधी असा उल्लेख येतो . नुकत्याच एका जुन्या नकाशाच्या आधारावर येसूबाई साहेबांच्या समाधी स्थानावर शिका मोर्तब झाले आहे . महाराणी येसूबाई फाउंडेशन राजधानी सातारा व जिज्ञासा इतिहास संशोधन संवर्धन सातारा या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून या समाधीच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत . या कामांमध्ये माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेश शिर्के यांनी पुढाकार घेतला आहे यामध्ये माहुली ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने व हरिनारायण मठाचे ट्रस्टी पांडुरंग नेवसे यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.