पुण्यातील तरुणाने तयार केले
महिलांचे 40 हजार अश्लील व्हिडिओ
पुण्यामध्ये पोलिसांनी एका २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या तरुणाच्या मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॉर्नोग्राफिक साहित्य आढळून आलं आहे. शुभम अवदे असं या तरुणाचं नावं असून तो त्याच्या शेजारी राहणाऱ्या महिलांचे फोटो एडीट करुन पॉर्न व्हिडीओ बनवायचा अशी माहिती समोर आलीय. प्राथमिक तपासामध्ये शुभम मागील सहा महिन्यांपासून हे असे पॉर्न व्हिडीओ बनवत असल्याची माहिती समोर आलीय. या तरुणाच्या मोबाईलमध्ये पाच हजार फोटो आणि 40 हजार व्हिडिओही सापडले आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आंध्र प्रदेश मधील धक्कादायक प्रकार,
बकर्याऐवजी दिला व्यक्तीचा बळी
आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. दारुच्या नशेत येथे एका व्यक्तीने बकऱ्याचा बळी देण्याऐवजी एका व्यक्तीचाच बळी दिलाय. पोलिसांनी या प्रकरणामध्ये आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरु केलाय. ही घटना १६ जानेवारी रोजी घडलीय. संक्रांतीच्या उत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या बकऱ्यांचा बळी देण्याच्या कार्यक्रमादरम्यान मंदिराच्या बाजूलाच ही घटना घडल्याचं सांगितलं जातं आहे. इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार चलापती नावाच्या एका व्यक्तीला मंदिरात बकऱ्याचा बळी द्यायचा होता. मात्र चलापति जेव्हा मंदिरात आला तेव्हा तो दारुच्या नशेत होता.
आम आदमी पार्टीकडून भगवंत मान
मुख्यमंत्री पदाचे उमेदवार
पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच प्रमख राजकीय पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर केल्या जात असून, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देखील जाहीर केला जात आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीकडून भगवतं मान हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. अरविंद केजरीवाल हे आज भगवंत मान यांच्या नावाची घोषणा देखील करण्याची शक्यता आहे.
14 मुलांच्या अपहरण प्रकरणी
गावित भगिनींना मरेपर्यंत जन्मठेप
1990 ते 1996 दरम्यान 14 मुलांचे अपहरण करुन त्यातील पाच जणांची हत्या केल्याप्रकरणी कोल्हापूर न्यायालयाने दोषी ठरलेल्या रेणुका शिंदे आणि सीमा गावित या बहिणींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेत बदलली. 20 वर्षांपूर्वी दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अद्याप अंमलबाजावणी न झाल्याने आरोपींची आता जगण्याची इच्छा आणि अपेक्षा वाढली असल्याचे सांगत फाशी रद्द करण्याची मागणी करणारी याचिका रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली.
काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना
तातडीने अटक करा : नारायण राणे
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांबद्दल वक्तव्य करताना वापरलेल्या आपत्तिजनक भाषेचा मी निषेध करतो. काँग्रेसचे नेते या स्तरापर्यंत खाली जातील याचं मला आश्चर्य मला वाटत नाही,” असं राणे ट्विटवरुन प्रतिक्रिया देताना म्हणालेत. त्यांनी या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींबरोबर भाजपा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही टॅग केलंय. अन्य एका ट्विटमध्ये नारायण राणेंनी, “आता पोलिसांची जबाबदारी आहे की त्यांनी पटोलेंना अटक करावी. हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दा आहे.
ऑस्करच्या यूट्यूब चॅनेलवर
दिसणार जय भीम सिनेमा
जय भीम’ या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. आज या चित्रपटाने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. ‘जय भीम’ हा दाक्षिनात्य सिनेमा आता ऑस्करच्या यूट्यूब (Oscar youtube) चॅनेलवर दिसणार आहे. हा मान मिळणारा ‘जय भीम हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे’
अफगाणिस्तान मध्ये
भूकंप 26 जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील बादघिस प्रांतात सोमवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यामुळे झालेल्या नुकसानीत 26 लोकांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणी अपघात होऊन अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 इतकी मोजण्यात आली.
कोरोना महामारीदरम्यान
दीड लाख मुले झाली अनाथ
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) सर्वोच्च न्यायालयात एक मोठा खुलासा केला आहे. आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, 1 एप्रिल 2020 पासून कोरोना महामारीच्या काळात देशातील 1 लाख 47 हजार 492 मुलांनी त्यांचे आई, वडील किंवा दोघेही गमावले आहेत. गेल्या दोन वर्षांत अनाथ मुलांच्या पालकांपैकी बहुतेकांना कोरोनाव्हायरस किंवा इतर घटनेमुळे आपला जीव गमवावा लागला असल्याचं NCPCR ने आपल्या अहवालात म्हटलं आहे.
शाळा सुरु करण्यासंदर्भातील
अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील
ज्या जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय कोरोना केसेस कमी असतील त्या ठिकाणी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा, अशी चर्चा झाली होती. मात्र, राज्यात गेल्या काही दिवसांपासून 40 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत होते. त्यामुळं शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोना रुग्णसंख्या आणि सद्यस्थिती पाहता शाळांबाबत घेतलेल्या निर्णयचा फेरविचार करता येईल. शाळांबद्दल आठ पंधरा दिवसात निर्णय घेण्यात येईल. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील पालकांमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं सांगितलं. शाळा सुरु करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेतील.
घरावर उभारली 150 किलो
कांद्याची प्रतिकृती
येवला तालुक्यातील धनकवाडी येथील शेतकरी बंधूंनी केलेल्या अनोख्या प्रयोगातून दाखवून दिले आहे. ऊसापाठोपाठ कांदा हे मोठे नगदी पीक आहे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने हा कांदा लागवडीचा प्रयोग करतात. धनकवाडी प्रगतिशील शेतकरी साईनाथ भगवंत जाधव व अनिल भगवंत जाधव या दोघे भावंडांनी कांद्यामुळे हक्काचे घर मिळाले याची जाणीव ठेऊन घरावर चक्क 150 किलो कांद्याची प्रतिकृती उभारली आहे.
SD social media
9850 60 35 90