बँक अकाउंटमध्ये झीरो बॅलन्स असूनही तुम्ही खात्यातून काढू शकता पैसे

अनेकदा आपण अगदी व्यवस्थित आर्थिक नियोजन केलं तरी काही खर्च अचानक उद्भवतात किंवा आर्थिक संकटं येतात. त्यामुळे आर्थिक स्थिती कोलमडून जाते. आपल्याकडे पैसे शिल्लक उरत नाहीत. अशा परिस्थितीत काय करावं. यासाठीच आता आपण जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपण या आर्थिक संकटातून बाहेर पडू शकतो. या सुविधेमुळे तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नसले तरीही तुम्ही पैसे काढू शकता. या सुविधेलाच ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी (OD) असं म्हटलं जातं. फायनॅन्शियल एक्सप्रेसच्या वेबसाईटवर याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

OD च्या माध्यमातून अकाउंट होल्डर्सच्या आधीच्या उपलब्ध फंडाशिवाय त्यांच्या अकाउंटमधून पैसे काढता येऊ शकता येतात.

OD फॅसिलिटी किती प्रकारची असते?

OD ची सुविधेमुळे कोणत्याही सिक्युअर्ड किंवा अनसिक्युअर्ड लोनच्या स्वरुपात पैशांची व्यवस्था केली जाते. सिक्युअर्ड लोनसाठी कोणत्यातरी प्रकारची गॅरंटी आवश्यक असते.

काही वित्त संस्था ओव्हरड्राफ्टच्या स्वरुपात अनसिक्युअर्ड पर्सनल लोनही देतात. मात्र OD सुविधेत पैसे काढण्याची मर्यादा असते. म्हणजे एका वेळेस तुम्ही किती पैसे काढू शकता यावर मर्यादा आहे, त्याच मर्यादेपर्यंत OD मधून पैसे काढता येतात. तुमचं उत्पन्न आणि क्रेडिट क्रेडेंन्शियल याबरोबरच तुमचे ती बँक किंवा वित्तसंस्थेशी कसे संबंध आहेत यावर ही मर्यादा ठरवली जाते.

वेगवेगळ्या कर्जदारांसाठी ही मर्यादा वेगवेगळी असते. Unsecured OD सुविधा एका Specified Repayment बरोबर दिली जाते. याअंतर्गत पैसे घेणाऱ्याला मंजूर झालेली OD कितीही वेळा परत घेण्याची आणि प्री-पे करण्याची सुविधा असते. Unsecured OD सुविधेवरील व्याज कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअर, मंजूर क्रेडिट लिमिट, रि-पेमेंट टेन्युअर अशा गोष्टींवर आधारित असते.

OD फॅसिलिटीवरील व्याज आणि शुल्काची आकारणी

ओव्हड्राफ्ट अमाउंटवर व्याज आधीच निर्धारित केलेल्या दरानुसार लावले जाते. त्याची मोजणी नियमित स्वरुपात केली जाते आणि दर महिन्याला ते डेबिट होते. उदाहरणार्थ – जर तुम्हाला दरवर्षी 10% वार्षिक दराने 1 लाख रुपयांची OD सुविधा मिळाली असेल, आणि तुम्ही 10,000 रुपये काढत असाल आणि 20 दिवसांनंतर खात्यात पैसे परत जमा करत असाल, तर तुमच्याकडून बँक 54.8 रुपये {(1000 रुपयांचे 10%) x 20/365} फक्त 20 दिवसांसाठी व्याज घेईल. तुम्ही थकित रक्कम परत करण्यामध्ये काही चूक केलीत कर व्याज वाढतं. बँका सहसा Secured OD Facility साठी प्रीपेमेंट शुल्क आकारत नाहीत. मग अगदी तुम्ही पूर्ण रक्कम खात्यात परत केलीत तरीही हे शुल्क आकारलं जात नाही. OD खात्यात कोणत्याही निश्चित EMI किंवा मिनिमम रि-पेमेंट ची गरज नसते.

OD चा पर्याय कधी निवडावा?

“शॉर्ट टर्मसाठी ओव्हड्राफ्ट फॅसिलिटी लोनमधून फायदा होऊ शकतो. जिथे उत्पन्न अनियमित आहे अशा क्षेत्रात जर तुम्ही असाल तर तुम्हाला अनेकदा आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो. तेव्हा अशावेळेस OD सुविधा तुमच्यासाठी अगदी फायद्याचीच ठरू शकते, ”असं Bankbazaar.com चे CEO आदिल शेट्टी यांचं म्हणणं आहे. “OD Facility च्या मदतीने तुम्ही तुमच्यावर आलेल्या आर्थिक संकटाचा सामना करु शकता. महत्त्वाचं म्हणजे OD मुळे तुमच्या गुंतवणुकीला धक्का न लावता आर्थिक संकटातून सावरायला तुम्हाला मदत होते, ” असंही त्यांनी सांगितलं. मात्र अनावश्यक खर्चासाठी OD अकाउंटचा उपयोग केला जाऊ नये.

OD अकाउंट कशाप्रकारे काम करतं?

OD फॅसिलिटी सहसा तुमच्या सेव्हिंग्ज /करंट अकाउंटशी जोडलेली असते. जेव्हा तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमधून जास्त पैसे काढण्याचा प्रयत्न करता, तेव्हा मंजूर असलेल्या OD खात्यातून अतिरिक्त पैसे आपोआपच काढले जातात. त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करता, तेव्हा सगळ्यात आधी OD खात्यात जे कमी झालेले पैसे असतात त्यात ॲडजेस्ट केले जातात. आणि तो अतिरिक्त फंड तुमच्या बचत किंवा करंट खात्यात जमा केला जातो. एकूणच, अचानक आलेल्या आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी OD हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.