रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल तर्फे खडकी येथील बालक आश्रमात दंत तपासणी करण्यात आली. यावेळी उपस्थित बालकांचे दात तपासून त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले.
सामाजिक उपक्रम राबविणे यामध्ये रोटरी क्लब सातत्याने पुढाकार घेत असतो. त्यातील एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल तर्फे खडकी येथील बालक आश्रमात दंत तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ. वैजयंती पाध्ये यांनी उपस्थित बालकांची दंत तपासणी केली.
ह्या कार्यक्रमात डॉ वैजयंती पाध्ये ह्यांनी सर्व बालकांना दातांना निरोगी ठेवण्यासाठीच्या महत्वाच्या गोष्टी समजाऊन सांगितल्या. त्याबरोबरच दात घासण्याचे महत्व आणि दात शास्त्रशुद्ध पद्धतीने नेमके कसे घासायचे हे उपस्थित बालकांना समजावून सांगितले.
त्यानंतर त्यांनी सर्वांची दंत तपासणी केली गेली व ज्यांना गरज आहे त्यांना मार्गदर्शन केले. ज्यांचे दात स्वच्छ आहेत त्या सर्वांना व इतर सर्वांना ही डॉ. वैजयंती पाध्ये ह्यांनी बक्षीसे दिली. 11 वर्षापर्यंत च्या बालकांना टूथ ब्रश दिले आणि सर्वांना दातांविषयी मार्गदर्शक पर पुस्तके ही दिली.
रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या या उपक्रमाबाबत खडकी बालक आश्रमातर्फे आभार मानण्यात आले.
ह्या कार्यक्रमास अध्यक्ष राजेश चौधरी, डॉ. वैजयंती पाध्ये, रामेश्वर थोरात, डॉ. विद्या चौधरी आणि मधुकर कपाटे यांनी सहकार्य केले.