कोरोनासोबत भारतात आता मंकीपॉक्सही पसरतो हातपाय; आणखी एक रुग्ण सापडल्याने खळबळ
एकिकडे कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढत आहेत. अशात मंकीपॉक्सनेही भारतात शिरकाव केला आहे आणि मंकीपॉक्सचेही नवीन रुग्ण आढळून येत आहेत. आता आणखी एक रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. केरळमध्येच मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे.
बंडखोर सुहास कांदे म्हणतात पुढची निवडणूक धनुष्यबाणावरच, आदित्यजी तुमच्या हातात पहिला शिवबंधन बांधून घ्या
सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले कि, आदित्य साहेबांच्या हातात शिवबंधन नाही ते शिवसैनिक आहेत का? तुमच्या मताच्या भिकेवर मी सावकार झालो पण सरकार पाडण्यात पहिल्या 4 मध्ये मीच होतो. जे करतो छाती ठोक करतो आहे. यामुळे मला कोणाची भिती नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकनाथ शिंदेंना मारण्याची सुपारी देण्यापासून सुरुवात झाली. शिंदे नक्षली भागात पालकमंत्री होते.नक्षल्यानी शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून समर्पण केलं,अनेकांचे पोलिसांनी एन्काऊंटर केले, शिंदे साहेबांनी सगळ्या पोलिसांना 10 लाख दिले, सगळे नक्षलवादी एकत्र आले आणि शिंदे यांचा खून करायचं ठरलं, नक्षलवादी ठाण्यात आले, यावेळी सगळ्यांनी ठरवलं शिंदेंना झेड प्लस सुरक्षा द्या. एकनाथ शिंदेंना झेड प्लस द्यायची नाही असा वर्षावरून फोन आला, जो 16 व्या वर्षांपासून सेना जपतो त्याला तुम्ही मारायला निघाले असही सुहास कांदे पुढे म्हणाले.
ऐतिहासिक ‘रामसेतू’वरून नाशिकमध्ये ‘महाभारत’, नागरिक आणि प्रशासनमध्ये संघर्षाची ठिणगी
गोदावरी नदीवर ऐतिहासिक रामसेतू पूल हा पंचवटी आणि नाशिक शहराला जोडणारा मोठा दुवा आहे. नाशिक मधील चार महापुरांचा साक्षीदार असलेला गोदावरी वरील ऐतिहासिक रामसेतू पूल आज शेवटच्या घटका मोजतोय. गोदावरीला आलेल्या पुरामुळे पाण्याचा तडाखा बसल्याने रामसेतू पुलाला तडे गेले आहेत. तो जाण्या येण्यासाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून हा पूल पाडण्याच्या हालचाली दिसत असताना, नाशिककरांनी पुल पाडण्याला प्रचंड विरोध दर्शवला आहे.
नेमकं राष्ट्रपती कोण? मुख्यमंत्री शिंदेंची राष्ट्रपतींच्या अभिनंदनाची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय
काल राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रोपदी मुर्मू यांची निवड झाली. द्रौपदी मुर्मू यांनी 6 लाख 76 हजार 803 इतके मतमूल्य मिळवून विजय मिळवला. मुर्मू यांचा विजय झाल्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीनेही मुर्मू यांचे अभिनंदन करण्यात आले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र सरकारअंतर्गत येणाऱ्या सरकारी कार्यालयाकडून पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये मुर्मू यांचा फोटोच नसल्याने अनेकांनी आश्चर्य भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये भला मोठा फोटो हा एकनाथ शिंदे यांचाच दिसत आहे. दरम्यान नेटकऱ्यांनी या पोस्टवर चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.
कोयना परिसरात भूकंपाचे धक्के
कोयना परिसरात मागच्या काही दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. दरम्यान आज दुपारी (दि. 22) 1 वाजता भूकंप झाल्याचे सांगण्यात आले. भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल होती. दरम्यान, कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याचे अधिकाऱ्यांनी माहिती दिली. सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याची चर्चा होती. दरम्यान, कोयना धरण व्यवस्थापनाकडून सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.हा भूकंप संपूर्ण कोयना परिसरात जाणवला आहे. या भूकंपाची खोली 9 किलोमीटर इतकी होती. तर या भूकंपाचा केंद्र बिंदू कोयना खोऱ्यातील हेळवाक गावाच्या नैरूत्तेस 7 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती आहे.
पेन्शन, बंगला आणि बरंच काही… निवृत्तीनंतर रामनाथ कोविंद यांना मिळणार या सुविधा
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद 24 जुलैला निवृत्त होणार आहेत. त्यानंतर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.राष्ट्रपती असताना रामनाथ कोविंद यांना वेगवेगळ्या सुविधा मिळत होत्या, यामध्ये महिन्याला 5 लाख रुपये पगार, मोफत वैद्यकीय सुविधा, राहणं आणि प्रवास यांचा यामध्ये समावेश होता. निवृत्तीनंतरही कोविंद यांना यातल्या बऱ्याच सुविधा कायम राहणार आहेत.निवृत्तीनंतर रामनाथ कोविंद 12 जनपथ इकडे राहतील. ल्युटिन्स दिल्लीमधला हा सगळ्यात मोठ्या बंगल्यापैकी एक आहे. राष्ट्रपती पेन्शन कायद्यानुसार रामनाथ कोविंद यांना महिन्याला 1.5 लाख रुपये पेन्शन मिळेल. रामनाथ कोविंदा यांना याशिवाय दोन लँडलाईन फोन, एक मोबाईल फोन, इंटरनेट कनेक्शन, मोफत वीज आणि पाणी या सुविधाही दिल्या जातील. सोबतच एक कार आणि ड्रायव्हरही त्यांची सेवा करण्यासाठी असेल. याशिवाय त्यांना दोन सेक्रेटरी आणि दिल्ली पोलिसांची सुरक्षा असेल. निवृत्त झाल्यानंतरही रामनाथ कोविंद यांना आयुष्यभर मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात येतील. तसंच त्यांना प्रवासासाठी रेल्वेचं प्रथम श्रेणीचं आणि विमानाचं मोफत तिकीट आयुष्यभर दिलं जाईल.
रेशन कार्ड बाबत सरकारचा मोठा निर्णय, बोगस लाभार्थींना बसणार चाप
आधार कार्ड, पॅन कार्डप्रमाणेच रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. रहिवासी पुरावा, तसंच अन्नधान्याशी संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डचा वापर होतो. रेशन कार्डच्या माध्यमातून देशातल्या गरीब, गरजू नागरिकांना दरमहा अन्नधान्य वितरित केलं जातं. गेल्या काही वर्षांत सरकारने अन्नधान्य वितरण प्रणालीत अनेक सकारात्मक बदल केले आहेत.देशातले बहुसंख्य नागरिक अपात्र असतानाही रेशन कार्डशी संबंधित योजनांचा लाभ घेत असल्याचं निर्दशनास आलं आहे. आर्थिक स्थिती चांगली असतानाही काही नागरिक फसव्या मार्गाने रेशनशी निगडित योजनेचा लाभ घेतात. अशा बनावट गरिबांना लगाम घालण्यासाठी सरकार सरसावलं आहे. आता रेशन कार्डशी संबंधित मानकांमध्ये बदल केले जाणार असून, लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. मानकांमध्ये बदल केल्यानंतर फसव्या मार्गाने रेशनच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांबाबत स्पष्टता येणार असून, त्यांच्या मुसक्या आवळता येणार आहेत. `आज तक`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
“लिहून घ्या, हे सरकार कोसळणार,” आदित्य ठाकरेंचे मोठे विधान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे १२ खासदारदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. असे असताना शिवसेना पक्षाची जबाबदारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या खांद्यावर घेतली असून ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात मेळावे, सभा तसेच शिवसैनिकांच्या भेटी घेत आहेत. आज मनमाड दौऱ्यावर असताना त्यांनी विद्यमान सरकार जास्त काळ टिकणार नाही. हे सरकार कोसळणार आहे, असे खळबळजनक विधान केले आहे.
वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीस यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना खास शुभेच्छा
अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत, पती देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ”जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करत त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!” असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
सावरकरांचा उल्लेख करत अरविंद केजरीवालांची केंद्रातील मोदी सरकारवर बोचरी टीका
केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडताना केजरीवाल म्हणाले, “आम्ही तुरुंगवासाला घाबरत नाही, हे या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. इंग्रजांची माफी मागणाऱ्या सावरकरांची तुम्ही मुलं आहात, आम्ही भगतसिंग यांची मुलं आहोत. भगतसिंग यांनाच आम्ही आमचा आदर्श मानतो. ज्यांनी इंग्रजांसमोर नतमस्तक व्हायला नकार दिला आणि फासावर गेले. तुमच्या तुरुंगवासाला आणि फाशीला आम्ही घाबरत नाही, आम्ही अनेकदा तुरुंगात जाऊन आलो आहोत” असंही केजरीवाल म्हणाले.
विरोधकांच्या मिशन 2024 ला धक्का? शरद पवारांनी जाहीर केलेल्या उमेदवाराला ममतांचा विरोध!
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे, पण या निवडणुकीआधी विरोधकांमध्येच मतभेद असल्याचं समोर आलं आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मुख्य म्हणजे मार्गारेट अल्वा यांचं नाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं, पण आता या नावाला ममता बॅनर्जींच्या टीएमसीने विरोध दर्शवला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत टीएमसी मतदान करणार नाही. टीएमसीच्या या निर्णयाचा अप्रत्यक्ष फायदा भाजपचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखड यांना होणार आहे. जगदीप धनखड ते सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत.
चार दिवसात चौघांच्या निवृत्तीने क्रिकेट विश्वाला धक्का
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या खेळाडू एकापाठोपाठ एक निवृत्ती घेत आहेत. मागच्या चार दिवसांमध्ये चार क्रिकेटपटूंनी संन्यास घेतला, ज्यात इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्सचाही समावेश आहे. स्टोक्ससोबतच दिनेश रामदीन, लेंडल सिमन्स आणि काएल कोटझर यांनीही निवृत्तीची घोषणा केली, यातल्या तिघांनी टीमला वर्ल्ड कप जिंकवून दिला आहे.
SD Social Media
9850 60 3590