उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकेची झोड उठवली. उत्तर प्रदेशमधील या प्रचारदरम्यान सांगितले की, उत्तर प्रदेशमधील मुख्य समस्या ही येथील बेरोजगारी, आणि महागाईचा प्रश्न गंभीर आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. या सगळ्या समस्या असतानाही येथील नागरिक रोजी रोटी कमवण्यासाठी धडपडत आहेत.
पेट्रोल आणि डिझेलचे दर तर एवढे वाढले आहेत की, ते तुम्ही सहजासहजी खरेदी करू शकत नाही, तर कुटुंब चालवणाऱ्या कुटुंबाप्रमुखांकाकडे घरात गॅस सिलिंडेर घ्यायला पैसे नाहीत अशी अवस्था येथील नागरिकांची झाली आहे. या सगळ्या समस्यांचा प्रश्न गंभीर असतानाही येथील लोकं या परिस्थितीबरोबर लढत आहेत. भाजप सरकारने या लोकांना वाऱ्यावर सोडले आहे. उद्योगपतींसाठी मात्र हे सरकार सगळी व्यवस्था करत आहेत.
देशातील संपत्ती भाजप सरकार आपल्या मित्रांना वाटत आहे, त्यामुळे श्रीमंत व्यापारी अतिश्रीमंत होत आहेत. तर दुसरीकडे मात्र सामान्य आणि मध्यम व्यापाऱ्यांसाठी काहीही करण्यात येत नाही. प्रियंका गांधी म्हणाल्या की, मी ज्या ज्या मतदार संघात दौरा करते त्या त्या मतदार संघातील मतदार सांगतात की, रोजी रोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. महागाईमुळे आम्ही काहीच विकत घेऊ शकत नाही ही वास्तव परिस्थिती आहे.
वास्तव परिस्थिती ही आहे की, धर्म आणि जातीच्या गोष्टीने आपले पोट नाही भरणार. शिक्षणावर बोलताना त्यांनी सांगितले की, तुम्ही मुलांना यासाठी नाही शिकवत की ते मोठे होतील आणि एकमेकांबरोबर लढत राहतील. आपण आपल्या मुलांना यासाठी शिकवता की ते नोकरी शोधतील आणि आपलं भविष्य घडवतील.
प्रियंका गांधी यावेळी सांगितले की, कॉंग्रेसचं जर सरकार आले तर सरकारतर्फे गहू धान्याला प्रतिक्विंटल 2500 रुपयांचा दर देऊ, शेकऱ्यांची कर्ज माफ करू, तसेच कोरोना काळातील छोटे दुकानदार आणि छोटे व्यापाऱ्यांची वीज बिलं माफ करण्याची अश्वासनं त्यांनी दिली. तर 20 लाख युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्याच्या आश्वासनाबरोबरच महिलांना सरकारी नोकरीत 40 टक्के आरक्षण देऊ. सरकारतर्फे पोलीस भरती करुन त्यामध्ये 25 टक्के महिलांना संधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.