शिवसेना(बाळासाहेब ठाकरेंची) आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना औरंगाबादहून एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
काल दुपारी त्रास जाणवू लागल्याने त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळीच त्यांना तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आलं आहे. टीव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.
संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी संजय शिरसाट आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने संजय शिरसाट यांनी जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केली होती.