जन्म. २३ जून १९५८ मुंबईत.
मुकेश खन्ना यांना त्यांच्या शक्तीमान च्या रोलसाठी तसेच बी.आर.चोप्राच्या ‘महाभारता’तील भीष्म पितामहच्या रोलसाठी आजही ओळखले जाते. लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वच शक्तिमानचे चाहते होते. ‘शक्तिमान’ ही व्यक्तिरेखा ९० च्या दशकात एवढी प्रसिद्ध होती की, ‘शक्तिमान’ ज्या पद्धतीने उडतो अगदी तसंच उडण्याचा प्रयत्न अनेक मुलं करायची. मुकेश खन्ना यांनी FTII मधून त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि १९८२ साली अभिनय करण्यास सुरुवात केली. मुकेश खन्ना यांनी ‘ब्रम्हांड-आर्यमॅन ब्रम्हांड’ का योद्धा या मालिकेत काम केले आहे. ‘तहलका’, ‘इंटरनॅशनल खिलाडी’ आणि ‘बरसात’ यांसारख्या चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. काही वर्षांनी अभिनेते मुकेश खन्ना हे अभिनयापासून दूर झाले. मुकेश त्यांच्या दोन अभिनय शाळांमध्ये मुलांना अभिनयाचे प्रशिक्षण देत आहेत. मुकेश खन्ना यांचे जयपूर आणि आग्रा या दोन ठिकाणी अॕक्टींग स्कुल आहेत.
संजीव वेलणकर, पुणे