साई रिसॉर्ट प्रकरणी किरीट सोमय्यांनी दिली चुकीची माहिती अधिकाऱ्यांकडून खुलासा

भाजप नेते किरीट सोमय्या मागच्या काही महिन्यांपासून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या दापोली येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी वेगवेगळे दावे करत आहेत. हा रिसॉर्ट चुकीच्या पद्धतीने बांधली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच त्यांनी हा रिसॉर्ट बांधल्यानंतर या रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडले जात असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी प्रशासनाने पाणी थेट समुद्रात जात नसल्याचा याबाबत अहवाल देऊनही सोमय्या आरोप करत होते. यावर आता पर्यावरण विभागानेही याचा खुलासा केला आहे. दरम्यान सोमय्यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे आढळून आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्ट प्रकरण गेले अनेक दिवस वादात सापडले आहे. अलीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडण्यात येत असल्याने पर्यावरणाची हाणी होत असल्याचे ट्विट केले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

मात्र, काल या ठिकाणी महसूल, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पाहणी करून गेले असून, साई रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडण्यात आले नसल्याचे  पाहणीत दिसून आले आहे. या पूर्वीच  दापोली उपविभागीय अधिकारी यांनीही शासनाला अहवाल सादर केला होता.

हॉटेल पासून काही अंतरावर सांडपाणी विल्हेवाट लावण्यासाठी टाकी आढळून आली आहे. परंतु समुद्रापासून काही अंतरावर बांधण्यात आली असल्याने त्या टाकीला कोणतीही पाईप जोडून समुद्रात थेट पाणी सोडण्यात आले नसल्याचे दिसून आल्याने केलेला दावा फोल ठरला जाण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्यांचा यापूर्वीही यु टर्न

मागच्या काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या भला मोठा प्रतिकात्मक हातोडा घेऊन रिसॉर्ट पाडण्यासाठी आले होते. दरम्यान ते रिसॉर्ट पाडणार का? याबाबत सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु सोमय्यांनी रिसॉर्टच्या बाहेरील काही अंतरावर गाडी पार्किंगसाठी लावण्यात आलेल्या टाइल्सवर प्रतीकात्मक हातोडा मारला अन् अवघ्या काही क्षणात ते तिथून निघून गेले.

मागच्या दोन दिवसांपासून सोमय्या म्हणत होते मी जाऊन रिसॉर्ट पाडणार परंतु त्यांनी अवघ्या काही तासातच  त्यांनी पलटी मारल्याचे बोलले जात आहे. आपण हॉटेलवर नाही तर अनिल परब यांनी सरकारी जागेत केलेल्या बेकायदेशीर जागेवरील हातोडा मारल्याचा उल्लेख करत त्यांनी बोलण्याचे टाळले. यावर सोमय्यांनी केलेल्या गाजावाजाचा चांगलाच पचका झाल्याचे दापोलीत चर्चा सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.